CRPF Jobs 2021: सीआरपीएफ मध्ये भरती,६० हजारपर्यंत पगार

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF Recruitment) २०२१ चे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. स्पोर्ट्स ब्रॅण्ड ऑफ ट्रेनिंग डायरेक्टरेटने सीआरपीए इन फिजियोथेरेपिस्ट (Physiotherapist)आणि न्यूट्रिशनिस्ट(Nutritionist) पदांवर परिक्षेसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे.

[ad_1]
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१ आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सीआरपीएफ भरती २०२१चे नोटिफिकेशनचे काळजीपूर्वक वाचा. नोटिफिकेशनची थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

नोकरीचा तपशील (CRPF Vacancy 2021 Details)
या माध्यमातून सीआरपीएफमध्ये ६ पदांवर भरती आहे. यामध्ये फिजिओथेरेपिस्ट ५ पद आणि न्यूट्रिशनिस्ट १ पद समाविष्ट आहे.

फिजिओथेरेपिस्ट: कोणत्याही प्रमाणित भारतीय किंवा परदेशी विद्यापीठापासून फिजिओथेरेपी MPT (स्पोर्ट्स) मध्ये मास्टर्स डिग्री असणे गरजेचे आहे.

न्यूट्रिशनिस्ट: एमएससी कोर्स किंवा न्यूट्रिशन एंड डायट्रिक्समध्ये पीजी डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा
फिजिओथेरेपिस्टः या पदांसाठी उमेदवाराचे वय ४० वर्षांहून कमी असणे आवश्यक आहे.
न्यूट्रिशनिस्ट: या पोस्टसाठी ५० वर्षांहून अधिक वयाचे उमेदवार अर्ज करु शकत नाही.

कुठे मिळेल नोकरी ?
सीआरपीएफमध्ये फिजिओथेरिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट पदावर अर्ज करण्यासाठी मुलाखतीद्वारे प्रवेश मिळेल. उमेदवारांना ईमेल किंवा कॉलरद्वारे मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुलाखतीचे आयोजन प्रशिक्षण निदेशालय, सीआरपीएफ, ईस्ट ब्लॉक -१०, लेवल -७, सेक्टर -१, आर.के.पुरम, नवी दिल्ली -११००६६ मध्ये केले जाऊ शकते.

असा करा अर्ज
अर्ज करण्यापूर्वी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करा. नोटिफिकेशनमध्ये सांगितलेली कागदपत्रे सोबत उमेदवारांनी igtrg@crpf.gov.in वर मेल करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि तो रिजेक्ट केला जाईल.

[ad_2]

पगार
फिजिओथेरेपिस्ट – दरमहा ५० हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.
न्यूट्रिशनिस्ट -दरमहा ५० हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

नोकरीचे नोटीफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Firstly Uploaded On : Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *