Month: November 2020

आपल्या शरीरासाठी ‘पाणी’ किती आवश्यक आहे…

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, जर पाणी नसते तर काय झाले असते. खरंच मित्रांनो हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकजण पाण्याचा वापर करतो. जसे कि, पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, आग विझवण्यासाठी, साफसफाई करत असताना आपण पाण्याचा वापर करतो. एक प्रकारे मानवाचे जीवन पाण्याविना अधुरे आहे. पण काहीजणांना या पाण्याची ऍलर्जी …

आपल्या शरीरासाठी ‘पाणी’ किती आवश्यक आहे… Read More »

महाराष्ट्र :- मृदा ( MAHARASHTRA :- SOIL )

महाराष्ट्रातील मृदा वैशिष्ट्यपूर्ण आहे .ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग वेगळे वेगळे पडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मृदा आहेत . खरे तर महराष्ट्रात गाव बदलले की भाषा व माती दोन्हीपण बदलतात ही तर म्हणच आहे . महाराष्ट्रातील शेती ( AGRICULTURE ) व वनांचा ( FOREST ) अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास आवश्यक आहे .

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ( PHYSICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA)

महाराष्ट्र हे भारतातील मध्यवर्ती राज्य आहे जे उत्तर भारत व दक्षिण भारतयांना एकत्र करण्याचे काम करते. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो .

महाराष्ट्राचा राजकीय भूगोल ( POLITICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA)

महाराष्ट्र हे भारताच्या 28 राज्यांपैकी एक आहे . महाराष्ट्राचा विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त अक्षांश तर 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त रेखांश असा आहे . महाराष्ट्राचा भाग हा भारताच्या मध्यभागात आहे जो उत्तर भारत व दक्षिण भारताला एकत्र करण्याचे काम करतो . महाराष्ट्राच्या राजकीय सीमा विविध राज्यांना लागतात .

महाराष्ट्र – नदीप्रणाली

महाराष्ट्रातील नद्यांना 2 भागांमध्ये विभाजित केले जाते. सह्याद्री पर्वत रांग ही मुख्य जलविभाजक म्हणून कार्य करते त्यामुळे पूर्व वहिनी व पश्चिम वाहिनी नद्या असे विभाजित केले जाते . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महराष्ट्रात उगम पावते . ही पूर्व वहिनी नदी म्हणून ओळखली जाते .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -4 ( INDIAN RIVER & RIVER SYSTEM PART – 4)

जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश होतो . ही नदी चीन , भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . या नदीचा जगात लांबी नुसार 15 वा तर आकारानुसार 9 वा क्रमांक येतो .जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला कांचनजुंगा हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे . ही नदी मुख्यतः एका प्रवाहात वाहत नाही तर सोबत अनेक प्रवाह घेऊन वाहते . या प्रकारच्या नद्यांना ब्रेडेड नद्या ( BREADED RIVERS ) म्हणून ओळखल्या जातात .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -3 (Indian rivers and river system part -3)

भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तसेच भारतातील सर्वात जास्त प्रवाह क्षेत्र हा गंगा नदीचा आहे
.गंगा नदी प्रणाली उत्तरेकडे हिमालय पर्वताचा मध्य भाग आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्प पठाराचा उत्तर भाग यांच्या दरम्यान आहे. प्रामुख्याने याच मैदानी प्रदेशाला गंगा मैदान असे संबोधले जाते. भारतीय भौगोलिक क्षेत्रफलापैकी 26.2% क्षेत्र गंगा नदी प्रणालीने व्यापले आहे. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे .

राज्यपाल व राज्यविधिमंडळातील राज्यपालांचे कार्य

मुख्यतः राज्यपाल हा विधिमंडलातील एक महत्वपूर्ण घटक आहे . राज्यपाल हा राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी असतो .

राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही .

राज्य कायदेमंडळातील ‛विधानपरिषद’

विधानपरिषद हे घटक राज्याचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे.राष्ट्रपतीची निवडणूक, घटना दुरुस्तीचे विधेयक यामध्ये विधान परिषदेस स्थान असते.सर्वाधिक विधानपरिषद सदस्य क्षमता असलेली राज्ये उत्तर प्रदेश (१००), महाराष्ट्र (७८),बिहार (७५) व आंध्र प्रदेश (५८) हे आहेत.

IPL वर साम्राज्य मुंबईचेच …

आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.