शिवकालीन किल्ले । एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १

मित्रांनो, इतिहास म्हटले कि, सर्वात अगोदर शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर येतो. नक्कीच तुमच्यासोबतही असेच घडत असेल. आणि शिवरायांचा हा इतिहास भक्कम व मजबूत करण्यासाठी शिवरायांना किल्ल्याची खूप साथ लाभली. शिवरायांनी स्वराज्याचे पहिले तोरण “तोरणा” किल्ल्याला बांधले. व इथूनच स्वराज्याची सुरवात झाली.

महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. आपला इतिहास हीच आपली ओळख असते व आपले भविष्य घडवण्यात महत्वाचा वाटा घडवते. लेण्या , किल्ले , पर्वत हे सर्व आपल्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. आपल्या राजाची, स्वराज्याची धरोहर आहे.    

1) शिवनेरी

किल्ल्याची उंची: ३५०० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती:- शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
 

2) सिंहगड

किल्ल्याची उंची – ४४०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती:- सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. 
 

3) राजगड

समुद्रसपाटीपासूनची उंची:- १३९४ मीटर.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती:- राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
 

4) कुलाबा किल्ला

उंची : हा किल्ला समुद्र सपाटीस समतल आहे.
किल्ल्याचा प्रकार: जलदुर्ग
गडाची माहिती :- तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर एक ‘ पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
 

5) सुधागड

किल्ल्याची उंची: ५९० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :-सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव.
सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.

संदर्भ : Wikipedia.
 

पुढील लेखात आपण अन्य काही किल्यांविषयी जाणून घेऊ , आपला इतिहास व संस्कृती संबंधित अत्याधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत वाचत STAY UPDATED … [नक्की वाचा : संपूर्ण शिवचरित्र ]

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

तुम्हीही साहित्यिक असाल व तुम्हाला तुमचा लेख स्टे अपडेटेड वर प्रसिद्ध करायचा असेल तर संपर्क साधा.
व्हाट्सअँप क्रमांक : 7020333927