शिवकालीन किल्ले । एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २

महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. शिवकालीन किल्ले -एक प्रवास इतिहासाकडे या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ. 

अगदी लहान वयात इतिहास घडविणारे व महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसलेले आपले राजे शिवछत्रपती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक किल्ले जिंकले. असे म्हटले जाते कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात ३५० हुन हि जास्त किल्ले ताब्यात होते. मित्रांनो, आम्ही आमच्या लेखात महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या कार्याची माहिती सगळेकडे पसरवायची आहे. यासाठी पोस्ट वाचा व मित्रासोबत नक्की शेअर करा.

पन्हाळा

किल्ल्याची उंची: ४०४० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती:- पन्हाळा किल्ला प्राचीन कालापासून प्रसिध्द आहे.प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह यांची पन्हाळा ही राजधानी होती. किल्ल्याचे बांधकाम भोज राजाच्या कालखंडात झाले आहे. पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. महाराणी ताराराणीच्या करवीर, कोल्हापूर संस्थानाची पन्हाळा ही राजधानी होती. 
 

प्रतापगड

किल्ल्याची उंची: ३५५६ फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स. १६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवून घेतले. दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे. जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता.

राजमाची किल्ला

किल्ल्याची उंची: २७०९ फूट 
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते.

अजिंक्यतारा

किल्ल्याची उंची: ३०० मीटर 
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. १९९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजीच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.

हरिहर किल्ला

किल्ल्याची उंची: ३५०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :-नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली . 

किल्ले लोहगड

किल्ल्याची उंची: ३४२० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
 

पुरंदर

किल्ल्याची उंची: १५०० मीटर 
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

 सज्जनगड

किल्ल्याची उंची: ३००० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- प्राचीन काली या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणू लागले. या शब्दात अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे.
 

रतनगड

किल्ल्याची उंची: ४३०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- १७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती.
 

सिंधुदुर्ग

किल्ल्याचा प्रकार: जलदुर्ग
गडाची माहिती :- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. [नक्की वाचा : शिवकालीन किल्ले भाग १ ]

[ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास क्लिक करा ]

पुढील लेखात आपण अन्य काही किल्यांविषयी जाणून घेऊ , आपला इतिहास व संस्कृती संबंधित अत्याधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत वाचत STAY UPDATED … 

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

तुम्हीही साहित्यिक असाल व तुम्हाला तुमचा लेख स्टे अपडेटेड वर प्रसिद्ध करायचा असेल तर संपर्क साधा.
व्हाट्सअँप क्रमांक : 7020333927