शिवकालीन किल्ले । एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३

महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. शिवकालीन किल्ले -एक प्रवास इतिहासाकडे या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ. शिवरायांचा इतिहास अजरामर आहे आणि तो अजरामरच राहील.

अगदी लहान वयात इतिहास घडविणारे व महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसलेले आपले राजे शिवछत्रपती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक किल्ले जिंकले. असे म्हटले जाते कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात ३५० हुन हि जास्त किल्ले ताब्यात होते. मित्रांनो, आम्ही आमच्या लेखात महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या कार्याची माहिती सगळेकडे पसरवायची आहे. यासाठी पोस्ट वाचा व मित्रासोबत नक्की शेअर करा.

मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले . या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ .

रायगड


समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंची.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
गडाची माहिती :- किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००- १४५० पायऱ्या आहेत.

तिकोना

किल्ल्याची उंची: ११०० मी.

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग

गडाची माहिती :-

तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२ – ८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत अ त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा टंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला.

तोरणागड

पुणे जिल्हातील सर्वात उंच किल्ला : ४६०६ फूट

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग

गडाची माहिती:-

१६४७ मध्ये शिवरायांनी तोरणा स्वराज्यात आणला. त्याच्या प्रचंड पसरलेल्या विस्तारामुळे त्याचे नाव \प्रचंडगड\ ठेवण्यात आले. नंतर तोरण्याच्या दुरुस्तीमध्ये खणताना २२ हंडे भरुन सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्या जागीच तोरणाईची स्थापना करण्यात आली. हेच धन वापरुन समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर पहीली राजधानी \किल्ले राजगड\ आकारास आली!

सामानगड

किल्ल्याची उंची: ३००० फूट

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग

गडाची माहिती :-

कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते. त्याच्या आगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता.

दौलताबादचा किल्ला

किल्ल्याची उंची: २७८५ फूट

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग

गडाची माहिती :-

मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला म्हणून दौलताबादच्या किल्ल्याची मान्यता आहे. याचे प्राचीन नाव देवगिरी म्हणजे देवांचा पर्वत असे होते. हा भव्य असा किल्ला निसर्गदत्त पिरॅमिड आकाराच्या पर्वतावर बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याभोवती तीन पदरी प्रचंड भिंतीची तटबंदी उभी आहे. या किल्ल्याची उल्लेखनीय बाब म्हणजे याचे भक्कम खंदक, सरळसोट उतरण आणि भुयारी मार्ग, सारे मजबूत दगडी बांधकाम.

भुईकोट किल्ला

किल्ल्याची उंची : ६५७ मी.
किल्ल्याचा प्रकार : भुईकोट
चढाई : सोपी
किल्ल्याची माहिती : भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर शहरातील किल्ला आहे. १५ व्या शतकात बहामनी राज्याचे पाच भागात विभागणी झाली. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने भिंगार शहराजवळ नवीन शहर बसवण्यास सुरुवात केली. अहमदनगर शहराचे नाव याच निजामशहाच्या नावावरून पडले. भुईकोट किल्ला हा हुसेन निजामशहा यांनी बांधण्यास सुरुवात केली. या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. या किल्ल्यात चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रीय नेते बंदिवासात होते. “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यात लिहला.

बहादूरगड

 
उंची : ५०३ मी. (१६५० फूट)
किल्ल्याचा प्रकार : भुईकोट

किल्ल्याची माहिती :
बहादूरगडाला “पेडगावचा किल्ला या नावानेही ओळखले जाते. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे. या किल्ल्याच्या इतिहासाची ज्यादातार माहिती उपलब्ध नाही. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६६२ मध्ये मुघल सेनापती खान जहान याने पेडगाव येथे तळ ठोकला. खान जहान नेच या किल्ल्याचे “बहादूरगड” असे नामकरण केले. हा किल्ला सध्या सर्वासाठी पर्यटनास खुला आहे.

खर्ड्याचा किल्ला

किल्ल्याची माहिती : खर्डा किल्ला हा जामखेडमधील बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेला आहे. या किल्ल्याची बांधणी हि १७ व्या शतकातील असल्याचे पुरावे या किल्ल्यात पाहायला मिळतात. खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी केली.

हरिचंद्रगड

किल्ल्याची उंची : १४२४ मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग

किल्ल्याची माहिती :
हरिचंद्रगड हा महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला ६ व्या शतकातील कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील आहे. ११ व्या शतकात येथे विविध लेणी कोरण्यात आल्या. १४ व्या शतकात संत चांगदेवांनी हे ठिकाण ध्यान करण्यासाठी वापरले होते. या किल्ल्यावर बरेच काळ मुघलांची सत्ता होती. पण १७४७ मध्ये मराठ्यांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतले.

मांजरसुभा किल्ला

किल्ल्याचे नाव- किल्ले मांजरसुभा (Manjarsubha Fort)
किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी- सोपी
किल्ल्याची माहिती : अहमदनगर शहरात निजामशाहीची स्थापना झाल्यानंतर घाटमार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला आहे. अहमद निजामशहा च्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते, परंतु इतिहासात तसे काही सबळ पुरावे सापडत नाहीत.वांबोरी घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला असावा. 

[नक्की वाचा : शिवकालीन किल्ले भाग १ ] [नक्की वाचा : शिवकालीन किल्ले भाग  ]

[ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास क्लिक करा ]

पुढील लेखात आपण अन्य काही किल्यांविषयी जाणून घेऊ , आपला इतिहास व संस्कृती संबंधित अत्याधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत वाचत STAY UPDATED … 

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

तुम्हीही साहित्यिक असाल व तुम्हाला तुमचा लेख स्टे अपडेटेड वर प्रसिद्ध करायचा असेल तर संपर्क साधा.
व्हाट्सअँप क्रमांक : 7020333927