नांदेडमध्ये धमकीच्या ईमेलनं खळबळ : “10 कोटी रुपये द्या नाहीतर, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देईन…”

” 10 कोटी रुपये द्या नाही तर, नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय बॉम्बने उडवून देईन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर आलेल्या धमकी देणाऱ्या मेलनं एकच खळबळ उडाली.” दरम्यान, धमकीचा मेल पाठवणाऱ्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी देत त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व कार्यालयांची लिस्ट जोडत या आरोपीनं मेल केला होता. 

[ad_1]

काल (रविवारी) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर एक मेल आला त्यामध्ये 12 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय त्यासोबतच इतर महत्वाची कार्यालयं आणि संपूर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकले जाईल अशा आशयाचा संदेश या ई मेलमध्ये लिहिलेला होता.

सदर मेलची माहिती नांदेड गुन्हे शाखेच्या तांत्रिक मदतीने हा मेल पाठविणाऱ्याची माहिती घेण्यात आली. या ई मेलमध्ये दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी मेसेज लिहिलेला होता. त्याचप्रमाणे हॉटस्पॉटची क्षमता 1 किलोमीटर लिहिलेली होती. तसेच मेल करणाऱ्या इसमाने दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही लिहिलं होतं.

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने या प्रकरणी विविध अंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. त्यानुसार नाव शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ नावाच्या अर्धापूर येथील तरुणाने हा मेल पाठवला असल्याची माहिती नांदेड गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं माहिती घेऊन सदर आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रउफला जेरबंद करत त्याच्या विरुध्द वाजीराबाद पोलिसांत भारतीय दंड संहितेसह आणि सायबर क्राईम अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

दरम्यान, अचनाक आलेल्या या धमकीच्या ई मेलमुळे सर्वत्र भितीचं वातावरण पसरलं होतं. या आरोपीनं असं का केलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First Upload On 10 कोटी रुपये द्या नाहीतर, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देईन; नांदेडमध्ये धमकीच्या ईमेलनं खळबळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *