भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -3 (Indian rivers and river system part -3)

मागील लेखात आपण जाणून घेतले सिंधू नदी व तिच्या उपनद्या बद्दल … आता या लेखात आपण गंगा नदी प्रणाली बद्दल जाणून घेणार आहोत.

गंगा नदी प्रणाली (The Ganga drainage system):-

भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तसेच भारतातील सर्वात जास्त प्रवाह क्षेत्र हा गंगा नदीचा आहे. हिंदू धर्मातील विविध तीर्थक्षेत्र हे गंगा नदीच्या किनारी वसले आहेत. जसे प्रयागराज , ऋषिकेश , हरिद्वार , वाराणसी आदि..

गंगा नदी प्रणाली उत्तरेकडे हिमालय पर्वताचा मध्य भाग आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्प पठाराचा उत्तर भाग यांच्या दरम्यान आहे. प्रामुख्याने याच मैदानी प्रदेशाला गंगा मैदान असे संबोधले जाते. भारतीय भौगोलिक क्षेत्रफलापैकी 26.2% क्षेत्र गंगा नदी प्रणालीने व्यापले आहे. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे .

उगम( Origin ):- गोमुख (गंगोत्री), उत्तराखंड

नदीचा प्रवाह(Flow of river ):-

गंगा नदी व तिच्या उपनद्या यांचा नकाशावर दिसणारे दृश्य..

गंगोत्री हिमनदीतून उगमानंतर भागीरथी या नावाने ओळखली जाते. थोडे पुढे गेल्यावर देवप्रयाग येथ भागीरथी नदीला अलकनंदा हा गंगा नदीचा दुसरा मुख्य प्रवाह मिळतो. या नंतर नदीला गंगा असे नाव पडते. हरिद्वार मध्ये गंगा डोंगराळ भाग सोडून मैदानी प्रदेशात येत. गंगेचा सर्वसाधारण प्रवाह वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेला जातो. उत्तराखंड नंतर गंगा मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार , पश्चिम बंगाल या राज्यांतून जाते.

फारुखबाद , कनोज , कानपूर , प्रयागराज , वाराणसी , गझिपुर , पाटणा व या सोबत अनेक महत्वाचे उत्तर भारतातील शहर गंगा नदीच्या प्रवाह क्षेत्रात येतात. बांगलादेश मध्ये गेल्या नंतर गंगा नदी ब्रह्मपुत्रा ला मिळते . पुढे त्यांची ओळख पद्मा या नावाने होते. पुढे तसेच त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. जगप्रसिद्ध सुंदरबन त्रिभुज प्रदेश ( sundarban Delta )पद्मा नदी आपल्या शेवटच्या टप्प्यात तयार करते. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

गंगा नदीच्या उपनद्यांना दोन भागांमध्ये विभाजित केले जाते.

उजव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक नद्या ( Right bank tributaries ):-

 • यमुना
 • तामस
 • सोन
 • पुन पुन
 • आदि….

डाव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक नद्या ( Left bank tributaries ):-

 • रामगंगा
 • गोमती
 • घागरा
 • गंडक
 • कोसी
 • महानंदा
 • आदि…

गंगेच्या उपनद्यांपैकी यमुना ही सर्वात महत्वाची आहे. आता आपण जाणून घेऊ गंगा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक उपनद्यांनबद्दल.

1) यमुना :-

गंगा नदी नंतर भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून यमुना नदीचा उल्लेख येतो .यमुना ही गंगा नदीची सर्वात लांब तर 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उपनदी आहे .

ताजमहाल किनारी यमुना नदीचे विहंगत दृष्य ..

उगम :- यमुनोत्री , बंदरपूच ( उत्तराखंड )

यमुना नदी गंगेसोबतच तिच्या उजव्या बाजूस वाहते . ही नदी काही काळ हरियाणा व उत्तर प्रदेश राज्यांची सीमा निश्चित करते . ही नदी जवळपास सर्व उत्तर वाहिन्या नद्यांचा स्वतःमध्ये समावेश करून स्वतः गंगेत प्रयागराज ( उत्तर प्रदेश ) येथे मिळते . या ठिकाणी गंगा , यमुना व सरस्वती* मिळून त्रिवेणी संगम तयार करतात .

* सरस्वती ही नदी लुप्त नदी मानली जाते . ती प्रत्यक्षात दिसून येत नाही .

यमुना नदीच्या मुख्य उपनद्या :-

 • टोंस
 • चंबल
 • सिंध
 • बेटवा
 • केन
 • आदि …

2 ) तामस :-

उगम :- तमकुंड , कैमुर रांग ( मध्य प्रदेश )

तामस ही नदी गंगा नदीला उजव्या बाजूने मिळते . या नदीला पौराणिक महत्व लाभले आहे . या नदी किनारी वाल्मिकी ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आढळतो . ही नदी सिरसा ( उत्तर प्रदेश ) मध्ये गंगा नदीला मिळते .

3 ) सोन :-

उगम :- अमरकांतक पठार , मध्य प्रदेश

ही नदी दक्षिणेकडून गंगेला मिळणारी 2री सर्वात मोठी उपनदी आहे . ही नदी काही काळ कैमुर पर्वत रांगेला समांतर वाहते . सोबतच मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , झारखंड व बिहार या राज्यांमधून वाहते . या नदीच्या मुख्य उपनद्या रिहांद व उत्तर कोयल या नद्या आहेत . ही नदी शेवटी बिहार मध्ये गंगेला मिळते .

4 ) पुनपुन :-

उगम :- पालमा , छोटा नागपूर ( झारखंड )

ही नदी मुख्यतः झारखंड व बिहार या राज्यातून वाहते . या नदी बद्दल मुख्य असे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे काही नाही . ही नदी पाटणा शहराजवळ गंगा नदीला मिळते .

आता आपण पाहणार आहोत गंगा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या .

5 ) रामगंगा :-

उगम :- दुधतोली रांग , पोरी- गढवाल जिल्हा ( उत्तराखंड )

ही नदी गंगा नदीप्रमाणेच प्राचीन महत्व प्राप्त आहे . या नदीचे जुने नाव रथवहिनी हे होते . मुख्य म्हणजे ही नदी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून( JIM CORBET NATINAL PARK ) वाहते . नंतर फतेहगढ जिल्ह्यात ( उत्तरप्रदेश ) ही नदी गंगा नदीला मिळते .

6 ) गोमती :-

उगम :- गोमतताल , फुलहार झिल ( उत्तर प्रदेश )

ही गंगा नदीची डाव्या बाजूने मिळणारी एकुलती एक अशी उपनदी आहे जी हिमालय पर्वतावर उगम पावत नाही . ही नदी मुख्यतः मान्सून च्या पावसावर व जमिनीतून मिळणाऱ्या पाण्यावर वाहते . या नदीची मुख्य उपनदी साई नदी आहे . या नदीचा व गंगेचा संगम वाराणसी जवळ होतो . याच ठिकाणी मार्कनडे महादेव मंदिर स्टीथ आहे . या कारणामुळे धार्मिक दृष्टीने या नदीचे खूप महत्व आहे .

7 ) घागरा :-

उगम :- मापचचांगु हिमनदी , ( तिबेट )

ही नदी भारत , नेपाळ व चीन( तिबेट ) या देशांमधून वाहते . या नदीची मुख्य उपनदी शारदा ही आहे . ही नदी भारतात प्रवेश करताना 2 नद्यांमध्ये विभाजन होऊन येते . नंतर काही अंतर पार केल्या वर ही नदी पुन्हा एकत्र येऊन बिहार मध्ये रेवलगंज येथे गंगा नदीला मिळते . ही नदी नेपाळची सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते . सोबतच गंगा नदीची सर्वात लांब व 2 री सर्वात मोठी उपनदी आहे . घागरा नदीच्या खालच्या भागास शरयू म्हणून ओळखले जाते . याच शरयू नदीचा रामायणात उल्लेख आढळतो . या कारणामुळे ही नदी धार्मिक दृष्ट्या तितकीच महत्वाची ठरते .

8 ) गंडक ( गंडकी ) :-

उगम :- नुबाईन हिमाल हिमनदी , ( नेपाळ )

ही नदी नेपाळ व भारत या दोन देशांतून वाहते . याच नदीला नेपाळ मध्ये काळी गंडकी म्हणून ओळखले जाते . ही नदी उत्तर प्रदेश व बिहार राज्यांच्या सीमेवर विसर्प बनवत वाहते . या नदीचा महाभारतात उल्लेख आढळून येतो . या नदीच्या मुख्य उपनद्या त्रिशूली व पूर्व राप्ती या आहेत . याच नदीला नारायणी किंवा सप्तगंडकी म्हणून ओळखले जाते . ही नदी सोनपूर ( बिहार ) येथे गंगा नदीला मिळते .

9 ) कोसी :-

उगम :- तिबेट/नेपाळ सीमेवर

ही नदी तिबेट , नेपाळ व भारत या देशांतून वाहते . या नदीला नेपाळमध्ये सप्तकोशी म्हणून ओळखले जाते . काही काळापूर्वी या नदीला बिहारचा श्राप म्हणून उल्लेखले जायचे . याचे कारण ही नदी बिहार मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणण्यास कारणीभूत ठरत होती . या नदीच्या मुख्य उपनद्या कमला , बागमती , बुढी गंडक या आहेत .

10 ) महानंदा :-

उगम :- दर्जलिंग टेकड्या ,( सिक्कीम )

ही नदी भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . ही गंगा नदीची सर्वात पूर्वेकडील उपनदी आहे( ब्रह्मपुत्रा सोडून ) .ही नदी जवळपास 90% भारतात वाहते . शेवटी गोदागिरी मध्ये बांगलादेश येथे जाऊन गंगा नदीला मिळते .

तरी मित्रांनो , आपण या लेखात गंगा नदी व तिच्या मुख्य उपनद्यां पहिल्या . पुढील लेखात आपण पाहणार आहोत ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या मुख्य उपनद्या . तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा व वाचत राहा STAY UPDATED ..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *