महाराष्ट्र :- मृदा ( MAHARASHTRA :- SOIL )

महाराष्ट्रातील मृदा वैशिष्ट्यपूर्ण आहे .ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग वेगळे वेगळे पडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मृदा आहेत . खरे तर महराष्ट्रात गाव बदलले की भाषा व माती दोन्हीपण बदलतात ही तर म्हणच आहे . महाराष्ट्रातील शेती ( AGRICULTURE ) वनांचा ( FOREST ) अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास आवश्यक आहे .

महराष्ट्रात पठाराच्या उंचवट्यावर भरड उथळ प्रकारची मृदा आहे . मैदानावर मध्यम काळी मृदा आहे . तसेच नद्यांच्या खोऱ्यात सुपीक काळी मृदा आहे. कोकण किनाऱ्या लगत किनाऱ्यावरची गाळाची मृदा आहे . डोंगरउतारावर व घाटमाथ्यावर तांबूस ( तपकिरी ) मृदा आहे . महाराष्ट्र पठार व पूर्व विदर्भात उंचावट्याच्या भागात पिवळसर तपकिरी मृदा आहे . कोकणच्या काही भागात जांभा मृदा आढळते तर काही भागात खारी मृदा आहे . महराष्ट्रातील मृदेचे मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत .

महाराष्ट्रातील मृदेचे मुख्य प्रकार ( IMPORTANT TYPES OF SOIL IN MAHARASTRA ) :-

 • काळी मृदा ( रेगुड मृदा )
 • जांभा मृदा
 • किनाऱ्याची गाळाची मृदा
 • तांबडी मृदा ( पिवळसर मृदा )

काळी मृदा (BLACK SOIL) :-

काळ्या मातीला रेगुड मृदा असेही म्हणले जाते . या मातीने महाराष्ट्रातील म्हणजेच दक्खनच्या पठारावरील सर्वात जास्त भाग व्यापला आहे . महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मृदा म्हणून या मातीचा उल्लेख केला जातो सोबतच या मातीला कापसाची माती असेही म्हणले जाते .

महाराष्ट्रातील सर्वात कसदार काळी माती ( रेगुड माती ) …

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा पर्वत ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळ्या मातीचा आहे . परंतु ह्या मातीचे स्वरूप सर्वत्र सारखे नसते . मृदेच्या थराची जाडी बदलते व सोबत मातीचा रंगही बदलतो . मातीच्या बदलत्या रंगानुसार ह्या मातीचे काही प्रकार पडतात .

 • दरीतील गडद काळी मृदा
 • मैदानावरील मध्यम काळी मृदा
 • उथळ काळी मृदा
 • आदि …

गुणधर्म :-

 • नद्यांच्या खोऱ्यात सुपिकतेचे प्रमाण जास्त असते .
 • ओलावा टिकून धरण्याची क्षमता असते .
 • सुपीकता कमी होत नाही .
 • मान्सूनच्या पावसाचा अत्त्यांत जास्त उपयोग होतो .
 • जास्त पाणी झाल्यास दलदलयुक्त जमिनीत रूपांतर होते .

मुख्य पिके :-

 • कापूस
 • गहू
 • ज्वारी
 • तंबाखू
 • जवस
 • कडधान्य
 • ऊस
 • फळबागा
 • आदि …

जांभा मृदा :-

महाराष्ट्र राज्यात मुख्यतः पश्चिम भागात रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड व कोल्हापूर या जिल्ह्यात ही मृदा मिळते . सोबतच उंच डोंगराळ भागात ही मृदा मिळते . गडचिरोली जिल्ह्यात काही प्रमाणात ही मृदा आढळते .

गुणधर्म :-

 • मुख्यतः तांबूस तपकिरी व तांबड्या रंगाच्या छटा आढळतात .
 • उंचावरच्या मृदेत ओलावा टिकून धरण्याची क्षमता कमी असते .
 • सखल प्रदेशात काही प्रमाणात ओलावा टिकून धरते .
 • ही मृदा उथळ , खडकाळ व पातळ स्वरूपाची असते .

मुख्य पिके :-

 • फळबागा
 • हापूस आंबा* ( रत्नागिरी )
 • काजू
 • चिकू
 • आदि ….

*ह्या भागातील हापूस आंबा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे . हा आंबा मुख्यतः निर्यात केला जातो .

किनाऱ्याची गाळाची मृदा :-

ही मृदा मुख्यतः समुद्र किनारी मिळते व महाराष्ट्र मध्ये अरबी समुद्र किनारा 720 किमी लाभला आहे . या किनाऱ्याची मृदा गाळाची मृदा असते .याच मृदेला भाबर मृदा म्हणून ओळखले जाते .

गुणधर्म :-

 • क्षार खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते .
 • भाबर मृदा म्हणून ओळख आहे.
 • मुख्यतः पिकांना उपयुक्त नाही .

मुख्य पिके :-

 • नारळ
 • तांदूळ
 • पोफळीच्या बागा
 • आदि ….

तांबडी मृदा :-

ही मृदा पिवळसर मृदा म्हणूनही ओळखली जाते . सह्याद्रीच्या पर्वतमय भागात ही मृदा आढळते . मुख्यतः वैनगंगा नदीच्या खोऱ्यात ही मृदा आहे .

गुणधर्म:-

 • या मृदेत रचना , रंग व रासायनिक पदार्थाचे प्रमाण स्थिर नसते . या कारणामुळे सुपीकता स्थिर नसते .
 • सुपीकता कमी असते .
 • उंचावर पातळ थर , वाळूमिश्रीत व कमी सुपीक असते .

मुख्य पिके :-

 • भरड धान्य
 • बाजरी
 • तांदूळ
 • काही प्रमाणात फळबागा
 • आदि …

तरी या लेखात आपण जाणून घेतले महाराष्ट्रातील मुख्य मृदेच्या प्रकाराबद्दल . तरी तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे कंमेंट (comment) मध्ये नक्की कळवा . तुम्हाला स्पर्धा परिक्षाबद्दल कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन हवे असेल तर कळवा . आपली मागणी लवकरच पूर्ण केली जाईल . अधिक माहितीसाठी वाचत रहा STAY UPDATED

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *