तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, जर पाणी नसते तर काय झाले असते. खरंच मित्रांनो हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकजण पाण्याचा वापर करतो. जसे कि, पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, आग विझवण्यासाठी, साफसफाई करत असताना आपण पाण्याचा वापर करतो. एक प्रकारे मानवाचे जीवन पाण्याविना अधुरे आहे. पण काहीजणांना या पाण्याची ऍलर्जी सुद्धा आहे. म्हणजे त्यांचं शरीर पाण्याला स्वीकारत नाही. आपण याविषयी पुढे जाणून घेऊयातच पण अगोदर आपल्या शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे? आपल्याला तहान का लागते? किंवा पाणी न पीता आपण किती दिवस जिवंत राहू शकतो? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
आपल्या पृथ्वीतलावर ७१% पाणीसाठा आहे. यातील ९६.५% पाणी समुद्रात आहे. जे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. कारण समुद्रातील पाणी ‘खारे पाणी’ असते. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी आपण केवळ ०.३% टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी करू शकतो.
आपल्या शरीरात जवळपास ६० टक्के पाण्याचे प्रमाण असते. आपल्या शरीरातील एकूण रक्तामध्ये ७९ टक्के पाणी असते. आणि मेंदू आणि हृदयामध्यें हेच प्रमाण जवळपास ७३ टक्के असे आहे. तर फुफ्फुसांमध्ये ८३ टक्के आणि हाडांमध्ये ३१ टक्के पाणी असते.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या शरीरासाठी पाणी का आवश्यक आहे याचे उत्तर जाणून घेऊ…
आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भुमिका निभावत असते. पाणी घामाच्या स्वरूपात शरीराबाहेर येऊन आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करते. आपल्या शरीरातून सर्वात जास्त पाणी घाम तयार होऊन शरीराबाहेर पडते. ज्याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे. घाम येणं चांगलं आहे का? हे जाणून घेण्यासाठी “हे नक्की वाचा.” हा घाम आपल्या शरीरात तयार होणाऱ्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर काढत असतो. तसेच आपल्या शरीरात तयार होणाऱ्या मलमूत्रातून सुद्धा असेच विषारी पदार्थ शरीरातुन बाहेर पडतात. या सगळ्यामध्ये काही प्रमाणात पाणी असते. आता आपल्याला कळालेच असेल कि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कशी कमी होती. आणि साहजिकच आहे कि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर आपल्या शरीरात अजून पाण्याची गरज असते. त्यामुळे आपल्याला तहान लागते.
आता आपण दिवसभरात किती पाणी प्यायले पाहिजे? याविषयी जाणून घेऊ…
आपण दिवसभरात किती पाणी प्यायले पाहिजे हे आपल्या आसपासच्या वातावरणावर तसेच आपण दिवसभर किती काम करतो किंवा कोणते काम करतो यावर अवलंबून असते. जर आपण खूप कष्टाचे काम करत असलो तर आपल्याला जास्त पाण्याची आवशक्यता असते. असे म्हटले जाते कि, आपण दिवसभरात कमीतकमी ८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. शास्र्ज्ञाच्या संशोधनानुसार पुरुषांनी दिवसभरात कमीतकमी २.५ – ३.० लिटर पाणी आणि महिलांनी २.० – २.५ लिटर पाणी प्यायले पाहिजे.
पाणी शरीरासाठी किती आवश्यक आहे?
पाणी योग्य प्रमाणात पिल्याने आपले शरीर बऱ्याचश्या रोगापासून दूर राहतो. जसे कि Kideny Stone (मुतखडा), कफ, पीपल्स, इत्यादी.
आपण पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो?
संशोधनानुसार, मानव पाणी न पिता ३ दिवस राहू शकतो.
वरील माहिती वाचल्यावर आपला ✎ अभिप्राय नक्की कळवा.
📣 “वरील सर्व माहिती संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या लेखामधून घेतलेली आहे त्यात Stay Updated चा काहीही संबंध नाही. कृपया कुठलाही लेख वाचल्यावर लगेचच प्रात्यक्षिक करून पाहू नका.“
आज तुम्ही पाहता कि इंटरनेट वर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे आणि त्यातच म्हणजे तंत्रज्ञाशी संबंधित तर खूपच कमी माहिती आहे. अशीच माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर पुढील वेबसाइटला नक्की भेट द्या… [ मराठी माहिती ]