गणित चाचणी क्रमांक -2 उत्तरपत्रिका

मित्रांनो , मागील काही दिवसांपासून आपण दररोज विविध विषयांवर टेस्ट देत आहात . या टेस्ट आपल्यासाठी उपयुक्त होतील या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहे . विविध स्पर्धा परीक्षेच्या मागील काही वर्षात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन या टेस्ट Stay updated परिवाराने आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत . तरी आपण येथे काल झालेल्या गणित चाचणी – 2 ची उत्तरपत्रिका जाणून घेणार आहोत .

1)सचिन व मारुती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे . 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे असेल . तर सचिनचे आजचे वय किती ?

  1. 21
  2. 18
  3. 28
  4. 24

उत्तर – 4)24
4 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज – 60 वर्ष
:- आजची वयाची बेरीज :- 60 – 8 = 52
सचिनचे वय = [52/(6+7)]×6
                 = (52/13)×6
                 =24 वर्ष
सचिनचे वय :- 24 वर्ष

2)जर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते व 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल तर मुलाचे आजचे वय किती ?

  1. 15
  2. 18
  3. 12
  4. 24

उत्तर – 2)18
मुलाचे आजचे वय =
वर्षांपूर्वी ( पट – 1) – वर्षानंतर (पट – 1) / पटीतील फ़रक
= 6(3-1)+6(2-1)/(3-2)
= 18 वर्ष

3)अभय व त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 या प्रमाणात आहे . आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल . तर अभयाच्या आईचे 4 वर्षांपूर्वीचे वय किती ?

  1. 36
  2. 40
  3. 38
  4. 42

उत्तर – 3)38
           अभय        आई
आज।     2       :      7
8वर्षांनी    2      :      5
आईचे आजचे वय :-  7 × [ 8(5-2)/7×2-5×2]       
                  = 42 वर्ष
आईचे 4 वर्षांपूर्वी चे वय :- 42-4 = 38 वर्ष

4) आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे . 12 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळीच्या वयाच्या तिप्पट होते . तर मुलाचे 4 वर्षापूर्वी वय किती ?

  1. 24
  2. 20
  3. 27
  4. 16

उत्तर – 2)20 वर्ष
आजचे मुलाचे वय = x वर्ष
वडिलांचे वय = 2x वर्ष
उदाहरणातून , 2x – 12 = 3( x – 12 )
          :- x= 24
4 वर्षांपूर्वी मुलाचे वय :- 20 वर्ष

5) A , B व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असून , दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:2:3 असे आहे . तर C चे आजचे वय किती ?

  1. 10
  2. 15
  3. 20
  4. 25

उत्तर – 4) 25 वर्ष
10 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या वयाची बेरीज = 60- 30 = 30
C चे 10 वर्षापूर्वीचे वय – [3/(1+2+3)]×30
                                – 15 वर्ष
:- c चे आजचे वय = 15 + 10 = 25 वर्ष

6) राम व रवी यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे . रवी व राहुल यांच्या यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष , तर राम व राहुल यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे . तर रामचे वय किती ?

  1. 14
  2. 24
  3. 16
  4. 28

उत्तर – 3) 16 वर्ष
2( राम+ रवी + राहुल )
= 40 + 52+44 = 136
राम + रवी + राहुल = 68
मात्र , रवी + राहुल = 52 वर्ष
:- राम = 68 – 52 = 16 वर्ष

7) जर अक्षय व अभिनव यांच्या वयातील फरक 7 वर्षाचा असून 4 वर्षांपूर्वी अक्षयचे वय अभिनवच्या वयाच्या 8 पट होते तर त्या दोघांची आजची वय अनुक्रमे किती ?

  1. 6 , 13
  2. 12 , 5
  3. 14 , 7
  4. 16 , 9

उत्तर – 2)12, 5
अभिनवचे आजचे वय = x वर्ष
:- अक्षयचे आजचे वय = x + 7
:- x+7-4=8(x-4)
:- x = 5 :- अभिनव = 5 वर्ष
अक्षय = x + 7 = 5 + 7 = 12 वर्ष

8) 5 वर्षांपूर्वी अमन व अभय यांच्या वयाची सरासरी 17 वर्ष आहे मात्र आज अमन , अभय व अविनाश यांच्या वयाची सरासरी काढल्यास 17 वर्षच येते तर अविनाशचे आजचे वय किती ?

  1. 12
  2. 17
  3. 9
  4. 7

उत्तर – 4)7
5 वर्षांपूर्वी अमन व अभयचे एकूण वय :- 17 × 2 = 34
:- आजचे एकूण वय = 34 + 10 = 44 वर्ष
अमन , अभय , अविनाश यांचे एकूण वय = 17×3=51वर्ष
:- अविनाश चे वय = 51 – 44 = 7 वर्ष

9)1 वर्षापूर्वी सुधीर व सुरेश यांच्या वयाचे गुंणोत्तर 6:5 होते . 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:6 असेल तर सुरेशचे आजचे वय किती ?

  1. 16
  2. 18
  3. 15
  4. 21

उत्तर – 1)16 वर्ष
1 वर्षांपूर्वी चे वय – सुधीर = 6x वर्ष
सुरेश = 5x वर्ष
2 वर्षानंतर ,( 6x + 3 / 5x + 3 ) = 7/6
:- 6(6x + 3 ) = 7(5x + 3)
:- x = 3
:- सुरेशचे आजचे वय  = 5x + 1 = 5 × 3 + 1 = 16 वर्ष

10) वडिलांचे आजचे वय पिंटूच्या वयाच्या तिप्पट आहे  . 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय पिंटूच्या त्या वेळीच्या वयाच्या चौपट होते . तर पिंटूचे आजचे वय किती ?

  1. 12
  2. 15
  3. 18
  4. 20

उत्तर – 2) 15 वर्ष
आजचे वय — पिंटू = x वर्ष , वडील = 3x वर्ष
:- 3x – 5 = 4(x – 5 )
:- x = 15
:- पिंटूचे आजचे वय = 15 वर्ष

11) वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:1 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 256 आहे . तर 2 वर्षानंतर वडिलांचे वय किती ?

  1. 28
  2. 32
  3. 30
  4. 34

उत्तर – 4) 34 वर्ष
आजचे वय — मुलगा = x वर्ष , वडील — 4x वर्ष
:- X × 4X = 256
:- 4x^2 = 256
:- x = 8
:- 2 वर्षानंतर वडिलांचे वय  = 4x + 2
                            = 4 × 8 + 2
                            = 34 वर्ष

12) 2 वर्षांपूर्वी अर्चनाचे वय सुनीताच्या वयाच्या दुप्पट होते . जर त्या दोघींच्या वयातील फरक 2 वर्ष असेल तर अर्चनाचे आजचे वय किती ?

  1. 6
  2. 8
  3. 10
  4. 12

उत्तर – 1) 6
आजचे वय – सुनीता = x वर्ष , अर्चना = x + 2 वर्ष
:- x + 2 -2 = 2(x -2)
:- x = 4
अर्चनाचे आजचे वय :- x + 2 = 4 +2 = 6 वर्ष

13 )आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची वजाबाकी 40 वर्ष आहे . 5 वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 5 वर्षानंतर मुलाचे वय किती ?

  1. 8
  2. 10
  3. 20
  4. 15

उत्तर – 3)20
आजचे वय – मुलगा = x वर्ष , आई = x + 40 वर्ष
समीकरण x + 40 – 5 = 5 ( x – 5)
:- x = 15 वर्ष
:- 5 वर्षानंतर  मुलाचे वय = 15 + 5 = 20 वर्ष

14)आईचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या साडेचार पट आहे व त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे . तर किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 6 होईल ?

  1. 6
  2. 8
  3. 12
  4. 4

उत्तर – 1)6 वर्ष
आजचे वय – मुलगा = x वर्ष ,
आई = 9x /2 वर्ष
:- x + 9x / 2 = 44
:- x = 8
आजचे वय – मुलगा = 8 वर्ष ,
आई = 9×8/2 = 36 वर्ष
अजून , 6 वर्षांनी , त्यांच्या वयाचे गुणोत्तर = 8 + 6:36+6
:- 2 : 6 ( उत्तर – 6 वर्ष )

15) एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे तर त्याचे आजचे वय किती ?

  1. 12
  2. 16
  3. 24
  4. 8

उत्तर – 2)16 वर्ष
समजा त्या व्यक्तीचे आजचे वय = x वर्ष
:- x + 8 = 3( x – 8 )
:- x = 16 वर्ष

16) 8 , 18 या संख्यांची भूमिती मध्य किती ?

  1. 8
  2. 12
  3. 16
  4. 64

उत्तर – 2) 12
समजा a = 8 , b = 18 ,
तर  a:c :: c :b …….. c = भूमितीमध्य
:- 8 : c :: c : 18
:- c^2 = 8 × 18 = 144
:- c = 12

17)एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर 7:5 आहे . जर वर्गात 75 मुली आहेत तर त्या वर्गात एकूण विध्यार्थी किती ?

  1. 100
  2. 105
  3. 180
  4. 200

उत्तर – 3) 180
वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर – 7 : 5 :- 7 + 5 = 12
:- जर मुली 5 असतील तर एकूण विद्यार्थी 12
पण मुली 75 आहेत , तर
एकूण विध्यार्थी = 12/ 5 × 75
                     = 180
वर्गातील एकूण विध्यार्थी संख्या = 180

18)जर 533 रुपयांची वाटणी A , B ,C व D यांच्या मध्ये करायची आहे .ती वाटणी जर A:B = 3:4 , B:C = 5:6  व  C:D = 7:5  या प्रमाणात असेल तर B चा वाटा किती ?

  1. 105
  2. 120
  3. 140
  4. 168

उत्तर – 3)140
उदाहरणातील अटीवरून
     A.  B.  C.  D
     3.   4
           5.   6.
                  7.  5
    __________________
3×5×7. 4×5×7 4×6×7. 4×6×5.

A : B : C : D = 105 : 140 : 168 : 120
:- एकूण रक्कम = 105+140+168+120
                       =533
:- B चा वाटा = 140 रु                      

19)3 , 12 व 17 या संख्यांचे चतुर्थपद काढा .

  1. 26
  2. 36
  3. 51
  4. 68

उत्तर – 4)68
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 16 )

20)8 , 12 या संख्यांचे तृतीयपद काढा .

  1. 16
  2. 18
  3. 24
  4. 30

उत्तर – 2) 18
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 16 )

21)6, 24 या संख्याचा भूमितीमध्य काढा .

  1. 8
  2. 12
  3. 18
  4. 36

उत्तर – 2)12
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 16 )

22)एका पिशवीत 1 रुपये , 50 पैसे , 25 पैशाची नाणी 1:2:2 या प्रमाणात आहे . जर पिशवीत एकूण 50 रुपये असतील . तर 50 पैशाची किती नाणी आहेत ?

  1. 20
  2. 32
  3. 40
  4. 64

उत्तर – 3)40
संदर्भ प्रश्न क्रमांक (17)

23) जर  A:B = 2:3 , B:C =5:6  असेल तर A:C = ?

  1. 2:6
  2. 3:5
  3. 5:9
  4. 2:5

उत्तर – 3) 5:9
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 18 )

24)जर A=2B=3C  तर A:B:C = ?

  1. 1:2:3
  2. 3:2:1
  3. 6:3:2
  4. 2:3:6

उत्तर – 3)6:3:2
A =2B = 3C
:- A:B:C = 1/1 :1/2: 1/3 = 6:3:2
  वरील मंडणीनुसार A:B:C = 6:3:2

25) जर 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 असून त्यांचा लसावी 72 आहे तर त्या 2 संख्यापैकी लहानात लहान संख्या कोणती ?

  1. 24
  2. 12
  3. 16
  4. 18

उत्तर – 4) 18
असमाईक अवयवांचा गुणाकार = संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार
असमाईक अवयवांचा गुणाकार = 3×4 = 12
लसावी ÷असमाईक अवयवांचा गुणाकार  = मसावी
:- 72/12 = 6
:- लहान संख्या = 3 × 6 = 18

26) तीन मोटरगाड्यांच्या वेगाचे गुणोत्तर 3:2:7 आहे जर त्या तीन गाड्यांनी समान अंतर पूर्ण केले असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती ?

  1. 14:21:6
  2. 14:6:21
  3. 7:3:2
  4. 3:2:7

उत्तर – 1) 14:21:6
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 24 )

27) जर 2A =3B व 4B =5C असेल तर A:C =?

  1. 3:5
  2. 2:15
  3. 8:5
  4. 15:8

उत्तर – 4) 15 : 8
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 18 )

28)A , B व C यांना एक रक्कम 7:5:6 या प्रमाणात वाटली . जर C ला B पेक्षा 15 रुपये जास्त मिळाले तर ती रक्कम किती होती ?

  1. 200
  2. 270
  3. 360
  4. 540

उत्तर – 2) 270
7+5+6 = 18 , c ला B पेक्षा 15 रु जास्त ,
ती एकूण रक्कम = 18 ×15 = 270 रु

29 )जर a व b या संख्यांचा लसावी व मसावी x व y आहेत . तर खालील पैकी कोणता संबंध बरोबर आहे ?

  1. a:x=y:b
  2. a:b=y:x
  3. x:a=y:b
  4. b:a =y:x

उत्तर – 1)a:x =y:b
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 17 )

30) P व Q यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून , त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 40 असेल तर Q चे आजचे वय किती ?

  1. 20
  2. 25
  3. 15
  4. 12

उत्तर – 1)20 वर्ष
संदर्भ प्रश्न क्रमांक ( 17 )

ही आहे गणित चाचणी क्रमांक – 2 ची उत्तरपत्रिका तरी तुम्ही या प्रकारे सर्व प्रश्न सोडवले असतील ही आशा व आजच्या गणित चाचणी क्रमांक -3 साठी ALL THE BEST … असल्याचं नवनवीन TEST SERIES साठी आमच्या सोबत रहा …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *