भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग – 1

भारत हा प्राचीन सभ्यतेसोबत विज्ञानात अत्यंत प्रगत असलेला देश आहे . Upsc , Mpsc सारख्या विविध स्पर्धा परीक्षा मध्ये प्राचीन भारतातील विज्ञान व सभ्यतेचा अभ्यास हा एक महत्वपूर्ण घटक आहे . तरी या लेखात आपण या बाबत काही महत्वपूर्ण गोष्टीचा अभ्यास करणार आहोत .

धर्म :-

मानवाच्या निसर्गावर चाललेल्या संघर्षातून अनेक घटना उदयाला आल्या. लोकांना उदरनिर्वाहासाठी जंगले, पर्वतमय प्रदेश, टणक जमीन, दुष्काळ, पूर, हिंस्र व अन्य श्वापदे यांच्याशी सामना करून त्यावर मात  करावी लागली. याच प्रक्रियेतून त्यांनी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला; परंतु काही संकटावर मात करणे अशक्य असल्याचे आढळून आले. तसेच काही नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरणही देता येत नसल्याने लक्षात आले आणि याच कारणामुळे लोकांना निसर्गाशी मिळतेजुळते व्हावे लागले. प्रयत्नांबरोबरच लोक जमिनीची सुपीकता, योग्य वेळी येणारा पाऊस व अन्य निसर्गदत्त देणग्यांवर अवलंबून राहत होते. निसर्गाचे औदार्य व त्याचे शत्रुत्व या दोन्ही मुळे लोक धर्म व अतिमानवी शक्ती याचा वापर करू लागले.

प्राचीन भारतात ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववाद हा एक प्रभावी धर्म म्हणून विकसित झाला. त्याने कला, वाडमय आणि समाज त्यांच्या विकासावरही प्रभाव पाडला. ब्राह्मणी धर्माबरोबरच भारतात जैन धर्म आणि बौद्ध धर्म उदयास आले. इ.स. च्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचे भारतात आगमन झाले तरी प्राचीन काळात त्याचा फारसा फरक पडला नाही. बौद्ध धर्म कालौघात भारतातून लुप्त झाला तरी पूर्वेकडील जपानपर्यंत त्याचा प्रसार झाला होता. प्रसाराच्या प्रक्रियेत बौद्ध धर्माने भारतीय कला, भाषा आणि साहित्य या बाबी शेजारच्या प्रदेशातील लोकांपुढे मांडल्या. जैन धर्म भारतात सुरू राहिला आणि त्यांनी भारतीय कला व साहित्य यांच्या विकासाला साहाय्य केले. आजही जैन धर्माचे खूप अनुयायी आहेत. विशेषता कर्नाटक, गुजरात, आणि राजस्थान येथील व्यापारी समुदाय जैनधर्मी आहे.

वर्णव्यवस्था :-

भारतामध्ये सामाजिक वर्गाचा रचनेवर धर्माने विशिष्ट प्रकारे आपला प्रभाव टाकला. अन्य प्राचीन समाजामध्ये सामाजिक वर्गाची कर्तव्ये व कार्य कायद्याने निश्चित केली जात असत आणि त्यांची ही मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याचे काम राज्यकडून केलें जात असे.भारतातील वर्णव्यवस्थेत कायद्यांना राज्य आणि धर्म दोन्हीची मान्यता मिळवावी लागते. पुरोहित, योद्धे, शेतकरीमजूर यांची कार्य कायद्यात उद्ध्वस्त केली असतात आणि ती दैवी शक्तीमार्फत सांगितली जात, असे मानले जात असे. आपल्या कर्तव्यापासून विचलित होणाऱ्या व गुन्हा केल्यामुळे दोषी असलेल्या असल्याचे आढळणाऱ्या लोकांना तर लौकिकार्थाने शिक्षा ठोठावली जात असे. शिक्षा भोगण्यास खेरीज धार्मिक कर्मकांडे करावी लागत असत व शुद्धी अथवा प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. ही शिक्षा वर्णभेदाअनुसार निरनिराळी असत. कालांतराने वर्ण किंवा  सामाजिक वर्ग आणि जाती कायद्याने व धर्माने अनुवंशिक ठरवल्या. वैश्यानी कृषी उत्पादन करून कर भरावा आणि शूद्रांनी मजूर म्हणून सेवा करावी व त्यायोगे ब्राह्मणांना पुरोहित म्हणून व क्षत्रियांना राज्यकर्ते म्हणून आपला अधिकार गाजवता येईल. श्रमविभागणीवर आणि व्यवसायकौशल्यावर आधारलेल्या विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण जातिव्यवस्थेने समाजाची प्रगती ही व अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यात आरंभीच्या टप्प्यावर निश्‍चितच मदत केली. राज्याच्या विकासालाही वर्णव्यवस्थेने हातभार लावला. उत्पादन करणारा वर्ग आणि मजूर वर्ग शस्त्रहीन असत. दुसऱ्या जातीच्या विरोधात अशा तऱ्हेने उभी केली की, पीडित अथवा अशिक्षित लोक विशेषाधिकार प्राप्त झालेल्या लोकांच्या विरोधात एकत्र येऊ शकत नसत.

आपापली विहित कार्य करण्याची गरज निरनिराळ्या निराळ्या जातीतील लोकांच्या मनात इतक्या प्रभावीपणे खोलवर रुजवली गेली होती सर्वसामान्यपणे आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्याचा विचार लोकांच्या मनातही येत नसे. परधर्म भयावह असल्यामुळे दुसऱ्या धर्माचा स्वीकार करण्यापेक्षा स्वधर्माचा रक्षणार्थ आयुष्य वेचावे हितकारक मानले गेले. निम्न वर्णातील लोक परलोकात अथवा नंतरच्या जन्मा चांगले आयुष्य चाखायला मिळेल या श्रद्धेपोटी कठोर परिश्रम करीत असत. प्रत्यक्ष उत्पादन करणारे व त्या उत्पादनांना उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करणारे राजे,पुरोहित, अधिकारी, सैनिक, व मोठे व्यापारी यांच्यातील ताणतणावाची व संघर्षाची तीव्रता व वारंवारिता  या श्रद्धेमुळे कमी होत असे. त्यामुळे प्राचीन भारतात कधीही निम्नवर्णीयाकडून करून तीव्र प्रतिक्रिया उमटली नाही. ग्रीस व रोम येथील समाजव्यवस्थेत चाबकाच्या धाकाने आणि चाबकाचा फटका खाली तशी गुलाम करून कामे करून घेतली गेली त्याचप्रकारे वर्णव्यवस्थेने व ब्राह्मणी धर्माच्या शिकवणे द्वारा निर्माण झालेल्या विश्वासाने वैश्य व शूद्र यांच्याकडून करवुन घेतले.

शिल्प आणि तंत्रज्ञान :-

भारतीयांनी भौतिक संस्कृती कोणतीच प्रगती केली नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. विविध क्षेत्रातील उत्पादनांत त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. विविध प्रकारचे रंग तयार करणे यामध्ये भारतीय कारागीर कारागिरांनी प्राविण्य मिळवले होते. भारतात तयार केलेले रंग इतके चकाकणारे व पक्के होते की अजिंठा लेण्यांमधील सुरेख चित्रांचे रंगकाम आजही जसेच्या तसे टिकून राहिले आहे.

पोलाद बनवण्याच्या कलेतही भारतीय अतिशय कुशल होते. ही कला भारतात प्रथम विकसित झाली. फार पूर्वीच्या काळापासून भारतीय पोलादाची निर्यात जगातील अनेक देशात केली जात असे. नंतरच्या काळात त्याला वुत्झ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय कारागिरांनी बनवलेल्या पोलादी तलवारीसारखे तलवारी जगातील कोणत्याही देश बनू शकला नव्हता. आशिया व पूर्व युरोपातील संपूर्ण प्रदेशात या तलवारीला प्रचंड मागणी होती.

राज्यव्यवस्था :-

भारतीय लोक मोठ्या साम्राज्याची प्रशासन यंत्रणा उत्तम प्रकारे चालू शकत असत आणि मिश्र समाजातील समस्याही हाताळू शकत असत हे कौटिल्याच्या अर्थशास्त्राने  नि: संशय सिद्ध केले आहे. भारतात अशोकासारखा महान सम्राट निर्माण झाला. अशोकाने कलिंगावर विजय मिळूनही नंतर शांततेचे धोरण स्वीकारले. अशोक व इतर अनेक भारतीय राजांनी सहिष्णुतेच्या धोरणाचा अवलंब केला आणि राज्य धर्मियांच्या भावनांचा आदर राखण्यावर भर दिला. ग्रीस खेरीज भारत हा एकच देश कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लोकशाहीत प्रयोग करत होता.

तत्वज्ञानविषयक व्यवस्था :-

भारतीय विचारवंत जगाकडे माया म्हणून पाहत असत. त्यांनी आत्मा आणि ईश्वर यांच्या नातेसंबंधावर गहन विचार केला होता. खरे म्हणजे या संबंधाच्या समस्येविषयी भारतीयाएवढा खोलवर विचार इतर कोणत्याही देशातील  तत्वज्ञानी केला नव्हता. अध्यात्मवाद आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे प्राचीन भारत याबाबत प्रसिद्ध मानला गेला आहे;  परंतु भौतिक-इहवादी दृष्टीकोनही भारतीयांनी विकसित केला होता. भारतात उदयाला आलेल्या पाच तत्वज्ञान पैकी इहवादी तत्त्वज्ञानाची घटक संख्या तत्त्वज्ञान पद्धतीत आढळतात. सांख्य तत्वज्ञानाचा उद्गाता कपिल याचा जन्म इ. स. पूर्व सुमारे ५८० मध्ये झाला. यथार्थ ज्ञानाने आत्म्याला मुक्ती मिळवता येते. निरीक्षण, अनुमानशब्दप्रामाण्य यांच्यामार्फत यथार्थ ज्ञान प्राप्त करता येते. सांख्य तत्वज्ञानाला परमेश्वराचे अस्तित्व मान्य नाही. या तत्वज्ञानानुसार जगाची निर्मिती ईश्वराने केली नसून निसर्गाने केली आहे. इहलोक आणि तेथील मानवी जीवन नैसर्गिक शक्ती नियमित केले जाते.

इ स पूर्व सुमारे सहव्या शतकातील चार्वकाकडून इहवादी तत्वज्ञानाला जोरदार पाठिंबा मिळाला. जे तत्त्वज्ञान त्यांनी लोकांसमोर मांडले ते लोकायत या नावाने ओळखले जाते. ज्या बाबी माणसाला ज्ञानेंद्रियाद्वारे अनुभवता येत नाहीत त्याचे वास्तवात अस्तित्वातच नसते त्याचा युक्तिवाद चार्वाक करीत असे. परमेश्वर अथवा देव-देवता असतील अस्तित्वात नाहीत असे यातून सूचित केले जाते. तथापि व्यापार, शिल्प, हस्तकला, शहरीकरण यांचा ऱ्हास झाल्यामुळे आदर्शवादी तत्वज्ञानाला प्रमुख स्थान प्राप्त झाले. आदर्शवादी तत्त्वज्ञानाने जग ही एक माय आहे अशी शिकवण दिली. जगाचा त्याग करा व यथार्थ ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, अशी उपनिषदांनी लोकांना शिकवण दिली. पाश्चिमात्य विचारवंतांनी उपनिषदातील शिकवनीकडे लक्ष दिले; कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या मानवी समस्याचे निराकरण करण्यास ते असण्यास असमर्थ ठरले. विख्यात जर्मन तत्ववेत्ता शॉपेनहॉरने त्यांच्या तत्वज्ञानात वेदना आणि उपनिषदांना स्थान दिले. उपनिषदांनी या जन्मात त्यांचे सांत्वन केले आणि मृत्यूनंतरही त्यांचे सांत्वन करतील असे उद्गार ते काढीत असे.

मित्रांनो , आपण या लेखात भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा – 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली . पुढील लेखात आपण भारतीय इतिहास व सभ्यतेविषयी जाणून घेऊ . तरी वाचत रहा STAY UPDATED

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *