शिवचरित्र भाग – 1 (शिवजन्मापूर्वीचा इतिहास)

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या आगामी लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत . तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.

आपण कायम शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो , त्यांच्या पुतळ्याचे पूजन करतो, त्यांना देव मानतो .मग प्रश्न असा निर्माण होतो की कोण होते शिवाजी महाराज ?? नेमके त्यांचे कर्तृत्व काय?? माणूस त्याच्या कर्तृत्वावर देवपदावर जाऊ शकतो का ?? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे शिवचरित्र …..

छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगप्रवर्तक होते . महाराष्ट्र भागात त्यांनी लोकांच्या मध्ये राहून जे राज्य निर्माण केले . त्याने संपूर्ण भारताच्या इतिहासात बदल घडवून आणला .

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र :-

शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगीन होता . त्या काळी सर्वत्र राजेशाही अंमल होता . त्या काळात राजे आपल्या सुखात , चैनविलासात मग्न होऊन जात . तर दुसरीकडे असेही काही राजे होते की त्यांनी प्रजेच्या सुखासाठी खुप मोठ्या प्रमाणावर कार्य केले या मध्ये सम्राट अकबर , विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहेत . या सर्वांच्या वर जे नाव आदराने व गौरवाने घेतले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे .

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले . स्वराज्य म्हणजे आपले राज्य , प्रजेचे राज्य . शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रावर आदिलशाहीनिजामशाही यांचे वर्चस्व होते . त्यांचे एकमेकांसोबत असलेलं हाडवैर होते , सततच्या युद्धामुळे प्रजेला अतोनात हाल व नुकसान सहन करावे लागत होते . उघड उत्सव करणे , पूजा करणे अत्यंत धोक्याचे झाले होते . रयतेला पोट भरायला अन्न मिळत नव्हते . महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख , देशपांडे हे वतनदार होते परंतु त्यांचे लोकांकडे लक्ष नव्हते . त्यांना प्रेम होते ते आपल्या जहागिरीवर , वतनांवर . त्यासाठी ते आपापसात भांडत लढाया करत .या सर्व गोष्टींमुळे सामान्य जनता ( रयत ) त्रासून गेली होती .

शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले . रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले . वतनदारांना वठणीवर आणले , आपल्या लोकांना जागृत केले व त्यांना स्वराज्याच्या कामात भागीदार केले . सर्व धर्माच्या , जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले . सर्वाना सन्मान दिला , आदर केला परंतु जनतेला त्रास देणाऱ्या लोकांना मुळासकट उपटून टाकले .

संतांची कामगिरी :-

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले . दक्षिणेतून आलेल्या भक्ती लाटेचा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला . संतांमुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होण्याचे काम झाले . शिवाजी महाराजांच्या काळात व त्याच्या आधीच्या काळात संतांचे कार्य महत्वाचे ठरते .

संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ..

मुख्यतः संतांनी लोकांनां दया , अहिंसा , परोपकार , सेवा , समताबंधुभाव या गुणांची शिकवण दिली . या कारणांमुळे लोकांमध्ये जातीभेद , धर्मभेद या घटना कमी होऊ लागल्या . या संतांमध्ये मुख्यतः

श्रीचक्रधर स्वामी
     संत नामदेव
     संत ज्ञानेश्वर
     संत चोखामेळा
     संत गोरोबा
     संत सावता
     संत नरहरी
     संत एकनाथ
     संत शेख मोहहमद
     संत तुकाराम
     संत निळोबा

यांचा समावेश होता . सोबतच स्त्रीयांनी सुद्धा भक्ती लाटेत आपले मोठे योगदान दिले याचे उदाहरण म्हणजे

संत जनाबाई
     संत सोयराबाई
     संत निर्मालाबाई
     संत मुक्ताबाई
     संत कान्होपात्रा
     संत बहिणाबाई

मुख्य संत व त्यांचे प्रसिद्ध कार्य :-

1) श्रीचक्रधर स्वामी :-

  • मूलतः गुजरातचे राजपुत्र
  • महानुभाव पंथाची सुरवात
  • लीळाचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ

2) संत नामदेव  :-

  • अभंग-कीर्तनाचा प्रसार
  • गुरुग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात चारोळ्या
  • भक्तीचळवळ दक्षिणेकडे घेऊन जाण्याचे श्रेय

3) संत ज्ञानेश्वर :-

  • भावार्थदीपिका या ग्रंथाचे लेखन
  • संस्कृत मधील गीतेचे मराठी भाषांतर
  • आळंदी मध्ये समाधी

4) संत तुकाराम :-

  • शिवाजी महाराजांच्या समकालीन
  • भारुडे , अभंग , कीर्तन यांची रचना
  • तुकारामगाथा हा ग्रंथ

5) संत रामदास :-

  • दासबोध ग्रंथ प्रसिद्ध
  • मनाचे श्लोक प्रसिद्ध
  • लोकांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे ध्येय
  • प्रत्येक गावात हनुमान मंदिर आणण्याचे श्रेय

हा महाराष्ट्राचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास होता . असल्या वातावरणात स्वराज्य स्थापन करण्यात येणार असा विचारही कोणी मनात आणू शकत नाही असल्या काळात शिवाजी महाराजांनी ते शक्य करून दाखवले .

पुढील लेखात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सरदार घराणे व भोसले घराण्याचा इतिहास . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत….

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]


Join Us on Telegram


Join Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *