शिवचरित्र भाग – 4 ( सुरवात राजांच्या शिक्षणाची )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण शिवरायांचा जन्म, शहाजीराजांचे निजामशाही वाचवण्यासाठीचे प्रयत्ननंतर कर्नाटकात आगमन पहिले . तरी या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सुरवातपुणे पुनरागमन पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .

सुरवात शिक्षणाची :-

शहाजीराजांनी बंगळूरमध्ये आपला दरबार सुरू केला . तेथे त्यांनी अनेक भाषांचे पंडित , कलावंतांना आश्रय दिला . स्वतः शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते . शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांनी हुशार शिक्षकांची निवड केली . वयाच्या 7व्या वर्षांपासून शिवरायांचे शिक्षण सुरू झाले . लवकरच शिवाजी वाचण्या लिहिण्यात पारंगत झाले . आता वेळ होती युद्धकलेची वयाच्या 12 व्या वर्षी त्याना युद्धकलेची शिक्षण सुरू केले गेले . घोड्यावर बसने , कुस्ती खेळणे , दांडपट्टा फिरवणे , तलवार चालवणे या विद्या शिकण्यास प्रारंभ झाला .

काही काळ सोबत घालवल्यावर शहाजीराजांना कर्नाटकातील नायकाची राज्य जिंकण्याची मोहीम आली . या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहजींनी जिजाबाई व शिवरायांना आपल्या जन्मभूमी पुण्यात रवाना केले .

पुण्याचे रूप :-

पुण्यात परतून जिजाबाई आनंदी होत्या . परंतु त्यांना जे पुणे आठवत होते ते आता राहिले नव्हते . बंगळूरच्या सुभ्या नंतर शहाजींचे पुण्यावरचे लक्ष कमी झाले . शत्रूंनी पुणे उध्वस्त करून टाकले . लोकांना वावरण्यात संकट निर्माण झाले , मंदिरे उध्वस्त झाली होती , घर/ वाडे पडले होते . या गावचे अस्तित्व धोक्यात आले होते .

पुण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याची कायापालट करणे अत्त्यांत गरजेचे होते . जिजाबाई पुण्यात आल्या वर सर्वात पहिले त्यांनी जंगली प्राण्यांची व्यवस्था केली लोकांना शेती करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन दिले . चोरांचा बंदोबस्त केला या कामात त्यांना खरी साथ दिली ती कोंढण्याचे किल्लेदार दादाजी कोंडदेव यांनी . कडक स्वभाव , इमानी सेवक , शिस्त प्रिय म्हणून त्यांची ओळख होती . निजामशहाचा वजीर मलिक अंबर प्रमाणे पुणे प्रांतात दादाजी कोंडदेव यांचे कार्य जमीन महसूल क्षेत्रात प्रचंड मोठे मानले जाते . शिवाजीराज्यांच्या हाताने पुण्याचा कायापालट करण्याचे खरे काम दादाजींनी केले . या सोबतच शिवरायांचे शिक्षण करण्याचे काम दादाजींनी चालू ठेवले .

उत्तम राज्यकारभार कसा चालवावा , शत्रूशी युद्ध कसे करावे , किल्ले बांधणे , घोडे व हत्ती यांची परीक्षा घेणे व सोबतच गनिमी कावा या सर्व कला हळूहळू शिवरायांना अवगत होऊ लागल्या .

शिकवण जिजाबाईंची :-

 

आई जिजाबाई शिवाजी राजांना शिकवण देताना …

जिजाबाई म्हणजे सामान्य स्त्री नव्हत्या . त्या लखुजी जाधवांच्या कन्याशहाजी राजांच्या पत्नी होत्या . त्यांना राजकारणयुद्धनीतीचे धडे लहानपणी पासूनच मिळाले होते . जाधवभोसले या दोन प्रसिद्ध मराठा सरदार घराण्यांची परंपरा त्यांच्या ठायी एकत्र आल्या होत्या . या सर्वात वेगळ्या म्हणजे त्या स्वाभिमानस्वतंत्रता प्रेमी होत्या . वडिलांच्या एवढ्या पराक्रमनंतरही भर दरबारात झालेल्या त्यांच्या हत्येचे ते दुःख त्यांनी पचवले होते . परंतु आपल्या पुत्राने कोणापुढे चाकरी न करता स्वतःचे नवीन राज्य निर्माण करावे हे त्यांचे स्वप्न होते . या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या .

   या मावळ भागात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत . हे लोक अत्यंत स्वाभिमानी , कष्टाळूचपळ होते . परंतु जुलमी राजवटीमुळे ते त्रासले होते . या लोकांचा योग्य वापर करून घेण्याचे ध्येय जिजाबाईंचे होते .

जिजाबाईंनी शिवरायांना लोकांसाठी कार्य करण्याचे , लोकांना सुखी करण्याचे उपदेश दिले . रयतेला सुखी करून आपण त्यात आपले सुख मानण्याचा उपदेश जिजाबाईंनी शिवरायांना दिला . आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई . अन्यायाविरुद्ध लढण्याची , पराक्रम करण्याची त्यांची इच्छा होई .

अश्या परिस्थिती शिवरायांच्या हाती पुण्याची सुभेदारी आली . त्यांच्या सोबत शहाजीराजांचे अनेक जवळचे सहायक होते . ज्यामध्ये रघुनाथ बल्लाळ , सोनोपंत डबीर , माणकोजी दहातोंडे हे प्रसिद्ध नावे आहेत .

पुढील लेखात आपण रायरेश्वराचे मंदिरस्वराज्य स्थापनेचे प्रतिज्ञा पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Join Us on Telegram


Join Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *