शिवचरित्र भाग – 7 ( स्वकीय की परकीय )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण तोरणकिल्ला व स्वराज्याची राजधानी राजगड पहिली . तरी या लेखात आपण शिवरायांनी स्वकीय सरदारांचा केलेला बिमोड पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .

शिवरायांचे कर्तृत्व आत्ता पर्यंत संपूर्ण मावळ भागात पसरले होते . सर्वत्र त्यांची ओळख होऊ लागली होती . मावळातील गरीब लोग त्यांना आता येऊन मोठ्या प्रमाणावर मिळत होती . शिवराय म्हणजे त्यांचा एका प्रकारे जीव की प्राण होऊ लागले . परंतु हे मात्र मावळ भागातील सरदारांना खपले नाही . त्यांनी शिवरयांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या . राजांना याचा काही त्रास नव्हता परंतु या सरदारांनी स्वराज्याला हानी करण्याचे काम करू लागले . तळपायाची आग मस्तकात जावी या प्रमाणे शिवरायांनी आपल्या मावळ भागातील स्वकीय सरदारांचा बिमोड करण्याचे ठरवले .

घोरपडे सरदार :-

खंडोजी घोरपडेबाजी घोरपडे आदिलशाही दरबारातील सरदार होते . त्यांनी आदिलशहाच्या आदेशानुसार कोंढाणा भागात धुमाकूळ घालण्यास सुरवात केली . शिवरायांनी त्याना समजूत घातली परंतु त्यांना ते समजले नाही मग शिवरायांनी त्यांना हुसकून लावले व त्यांच्या भागात स्वराज्य कायम केले .

निंबाळकर व मोहिते सरदार :-

फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे होते . पण शिवरायांना त्यांच्या सोबतही लढाई करावी लागली .

शिवरायांचा जवळचा नातलग असलेला संभाजी मोहिते हा सुपे परगण्यात होता . त्याने स्वराज्याच्या विरुद्ध कारवायांना सुरवात केली . शिवरायांनी त्याला पुण्याला जाऊन पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली .

  या सर्व घटनांवरून हे तर लक्षात येऊन गेले होते की शिवरायांना स्वराज्य हे सर्वात प्रिय होते व ते आपल्या कर्तव्यापुढे नातेगोते काही मानत नव्हते .

जावळीचे मोरे :-

आता जवळपास सर्वत्र शिवरायांच्या नावाची चर्चा सुरू झाली . जावळीचे मोरे हे एक असे स्वकीय होते ज्यांना हे खपत नव्हते . मोरे हे आदिलशहाचे जहागीरदार होते . आदिलशहाने त्यांना “ चंद्रराव ” हा किताब दिला होता . त्यामुळे सर्व सत्ताधारी चंद्रराव या नावाने ओळखले जायचे . यांचा प्रदेश हा  रायगडापासून ते कोयना खोऱ्यापर्यंत पसरला होता . त्याचे विशेष म्हणजे जावळीचे पसरलेले वन हे होते . या वनात वाघ , लांडगे या श्वापदांचा वावर होता . एका प्रकारे ही वाघांची जाळीच होती . या कारणांमुळे मोऱ्यांच्या वाटेल कोणी जात नसे .

सुरवातीला मोऱ्यांचे चंद्रराव दौलतराव मोरे होते . 1645 मध्ये त्यांचा मृत्यू झाला या कारणामुळे त्यांच्या वारसदारांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चढाओढ लागली . शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना आपला सहयोग दिला . यामुळे यशवंतराव या जहागिरीचे नवे जहागीरदार झाले . शिवरायांना खंडणीचे आश्वासन दिले होते . परंतु नंतर मोरे आपल्या आश्वासनाला मुकले . त्यांना वाटत होते की आता आपल्याला कोणाच्या दबावाखाली राहून सत्ता करण्यात काय अर्थ आहे ? म्हणून तो शिवरायांविरुद्ध कट करू लागला , स्वराज्यावर स्वाऱ्या करू लागला , प्रजेला त्रास देऊ लागला . त्यामुळे शिवरायांना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम आखली .

मोहिमेच्या आधी शिवरायांना पत्र लिहून यशवंतराव यांना समज देण्याचा प्रयत्न केला . तर मोऱ्यांनी त्यांना अत्यंत अपमान जनक प्रतिउत्तर दिले . याचा बंदोबस्त म्हणून शिवरायांनी रायरीचा अजिंक्य किल्ला जिंकण्यासाठी मोहीम आखली . महिनाभर यशवंतराव यांनी प्रचंड कडवी झुंज दिली . परंतु खूप मोठ्या प्रमाणात सैन्य मारले गेल्यामुळे यशवंतराव आपल्या मुलाला सोबत घेऊन  पळून गेला . नंतर रायरीच्या किल्ल्यावर जाऊन लपला . तेथे परत शिवरायांनी रायरीचा किल्ल्याला वेढा दिला .तेथे तीन महिने लढल्यानंतर त्याने अखेर हार मानली व शिवरायांचा जावळीवर विजय झाला .

किल्ले रायगड :-

किल्ले रायगडचे मनमोहक दृश्य …

जावळीचा विजत सर्वात महत्वाचा झाला . या विजयामुळे स्वराज्य आधीपेक्षा दुप्पट झाले . यशवंतरावांचे सैन्यही राजांना येऊन मिळाले . रायरीचा प्रचंड किल्ल्या स्वराज्याला येऊन मिळाला . हा किल्ला पाहून शिवराय धन्य झाले . याच किल्ल्याला राजांनी रायगड हे नाव दिले . याच किल्ल्याला नंतर स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून निर्माण केले .त्या नंतर रायरी पासून थोड्याच अंतरावर असलेल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर एक नवीन किल्ल्याची निर्मिती केली . याच किल्ल्याला “ प्रतापगड ” हे नाव दिले . हा किल्ला पुढे खूप मोठ्या घटनेचा साक्षी ठरला .

पुढील लेखात आपण पराभव खानाचा पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *