शिवचरित्र भाग – 11 (पुरंदरचा वेढा व तह)

नमस्कार, मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत.मागील लेखात आपण शाहिस्तेखानाची फजिती पाहिली. तरी या लेखात आपण मिर्झाराजे जयसिंग पुरंदरचा तह ते पाहणार आहेत.तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.

छापा सुरतेवर:-

राजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती, मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता. त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते. राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा मारण्याची. आता त्या काळातील सुरुत एक सर्वात मोठी बाजारपेठ होती. युरोपियन सुद्धा सुरवातीला फक्त सुरतेत येऊन व्यापार करत होते. पौर्तुगीज , इंग्रज , डच असे युरोपियन तर अरेबिक व्यापारी या सोबत मुघल साम्राज्याची मोठी बाजारपेठ म्हणून सुरतेची ओळख होती.

राजांनी सुरतेवर आक्रमण केले. त्यातून स्वराज्याला अमाप संपत्ती मिळाली. सोबतच सर्वात पहिल्यांदा युरोपियन बातमीपत्रकामध्ये राजांचे नाव आले. या लुटीत मात्र राजांनी नीती सोडली नाही. राजांनी चर्च, मंदीरमशिदीला हात लावला नाही. कोणत्याही स्त्रीला त्रास दिला नाही. मात्र या लुटी नंतर औरंगजेब प्रचंड चिडला. त्यांनी संपूर्ण स्वराज्य संपवण्याचा निश्चय केला व मिर्झाराजे जयसिंग यांना मोठ्या संख्येने सैन्यासोबत स्वज्यावर चाल करून पाठवले. मिर्झा म्हणजे अकबराच्या नात्यातील राजपूत रक्त होते. हे अत्यंत इमानदार व शूर सेनापती होते. .

राजांवर दुःखाचा डोंगर :-

मिर्झाराजे जयसिंग व सोबत दिलेरखान प्रचंड सैनिक, दारुगोळा, खजिना घेऊन दक्षिणेकडे चाल करून आले. स्वराज्यावर खूप मोठे संकट आले होते. याच काळात राजांना कर्नाटकातून दुःखद बातमी समजली. शहजीराजांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले होते. शिवराय व जिजामातांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता. परंतु आता दुःख करण्याचा सुद्धा राजांच्या हातात वेळ नव्हता. राजांनी आपल्या मातेला दुःखातून सावरले व आपल्या नियोजनाची सुरवात केली.

किल्ले पुरंदर :-

स्वराज्यातील सर्वात बळकट किल्ला म्हणून पुरंदर ओळखला जात असे. हा किल्ला घेऊन आपण शिवरायांना मोठा आघात देऊ शकतो हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळं त्याने पुरंदरला वेढा दिला. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हे होते. ते अत्त्यांत शूरजिद्दी वीर योद्धा होते. तलवारबाजी मध्ये अत्यंत पटाईत व सर्व शूर साथीदार मावळ्यांचा सरदार अशी मुरारबाजीची कीर्ती होती.

 

किल्ले पुरंदर..

लढा पुरंदरचा:-

दिलेरखान आता किल्ला जिंकण्यासाठी आतुर झाला होता. त्याने किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. हळूहळू माचीचा बुरुज ढासळला व मुघल बुरुजातून घुसले. मराठ्याने वरती बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. परंतु लढा मात्र चालू ठेवला. आता मुरारबाजी चवताळून उठला होता. त्याने निवडक 500 मावळे घेतले व थेट आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. बालेकिल्ला सोडला व हरहर महादेवची डरकाळी फोडत मुघलांवर मावळे तुटून पडले. मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येत होते तरीही मुरारबाजी लढत राहिला. त्यांच्या सैन्याची दाणादाण उडवत होता. मुघल सैन्य घाबरले व दिलेरखानाच्या छावणीच्या दिशेने पळत सुटले.

मुरारबाजी व मावळे तावात मुघलांच्या माघे धावले. छावणीत घुसले व जोरदार मारा सुरू केला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या धडात, कोणाच्या शिरात तर कोणाच्या मस्तकात घुसत होती. मुघलांना कापत होती. एवढेच मराठे ते कोणालाच आटोपता आटोपत नव्हते. दिलेरखान थक्क झाला, अचंबित होऊन पाहत राहिला.

   दिलेरखान मुरारबाजीला म्हणाला ‛ तुझ्यासारखा वीर मी आजवर पहिला नाही, तू आमच्या बाजूला ये. बादशहा तुला सरदार बनवतील. जहागिरी देतील, बक्षीस देतील.’ हे ऐकून मुरारबाजी जास्तच चवताळून उठला. ‛ अरे ! आम्ही शिवरायांची माणस तू आमचा कौल घेतो काय ? आम्हाला काय कमी आहे? ‘असे म्हणत तो पुन्हा मुघलांच्या सैन्यावर तुटून पडला. पुन्हा मुघलांमध्ये हाहाकार उडू लागला. दिलेरखानाने आपल्या अंबरीतून बाणाने मुरारबाजीचा वेध घेतला. त्याचा बाण बाजीच्या कंठात घुसला, मुरारबाजी पडला. मावळ्यांनी आपल्या सरदाराचे शरीर उचलून थेट बालेकिल्ल्या गाठला. परंतु लढणे सोडले नाही व आपला सरदार पडला म्हणून काय झाले आम्ही सर्व मुरारबाजीच आहेत म्हणून पुन्हा लढू लागले.

बातमी शिवरायांच्या जवळ पोहचली. त्यांना अत्यंत दुःख झाले. त्यांनी विचार केला की एकएक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल, पण आपले माणसे विनाकारण मरतील. राजांना हे नको होते, म्हणून त्यांनी एक योजना आखली.

पुरंदरचा तह :-

राजांना लक्षात आले होते की आता शक्ती चालत नाही, युक्ती कामी येत नाही. असल्या काळात माघार घ्यावी लागेल. म्हणून तह करण्याच्या निश्चयाने राजे जयसिंगासोबत बोलले. जयसिंग मोठा मुसद्दी होता परंतु राजपूत होता. राजांनी वतातघाटीचे बोलणे सुरू केले. ‛ मिर्झाराजे, आपण राजपूत आहेत. आमचे दुःख आपण जाणता. आम्ही हे साम्राज्य लोकांच्या हितासाठी केले आहे. तुम्ही स्वराज्याचे काम हाती घ्या, आम्ही तुमच्या सोबत उभे राहू.’ परंतु मिर्झाराजे जयसिंग काही तयार झाले नाही. त्यांनी राजांना तह करण्यास भाग पाडले.या तहात 23 किल्ले व 4लक्ष हुनांचा मुलुख मुघलांना देण्याचे कबूल केले. हा तह 1665 साली झाला.

राजांनी आग्र्याला जाऊन औरंगजेब बादशहाची भेट घ्यावी हा मिर्झाराजेयांनी प्रस्ताव ठेवला व सोबत आपण राजांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार ही हमी दिली. राजांनी या प्रस्तावाला उत्तर दिले व आपण आग्र्याला जाणार असे मिर्झाराजांनी सांगितले.

पुढील लेखात आपण राजांची आग्राभेट व बादशहाच्या हातावर तुरी पाहणार आहोत. तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *