White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता ‘व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक

White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक 
Coronavirus (Photo Credit: IANS)

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या संकटामध्ये ‘ब्लॅक फंगस’ नावाच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाने ओळखला जाणारा हा आजार देशातील अनेक राज्यांत आढळला आहे. सरकार यावर उपाययोजना करत असतानाच आता, ‘व्हाईट फंगस’चे (White Fungus) रुग्ण समोर आले आहेत. बिहारची राजधानी पटना येथे व्हाईट फंगसचे 4 रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘व्हाईट फंगस’ हा म्यूकोरमायकोसिसपेक्षा जास्त घातक आहे, कारण तो फुफ्फुसांव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम करतो. पटना मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस.एन. सिंह यांनी इंडिया टीव्हीला सांगितले की, अशा पांढऱ्या बुरशीचे अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.

[ad_1]

डॉ. सिंह म्हणाले की, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना मधुमेह आहे, जे एड्सचे रुग्ण आहेत, ज्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे, अशा लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर वापरताना झालेल्या निष्काळजीपणामुळे त्यांना ‘पांढर्‍या बुरशीचे धोका’ उद्भवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. लोक ऑक्सिजन सिलिंडर्सला जोडलेल्या ह्युमिडिफायरमध्ये नळाचे पाणी वापरतात. टॅप वॉटरमध्ये ‘पांढरी बुरशी’ असू शकते, जी ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या छातीत संसर्गाचा स्रोत बनू शकते.

सिंह म्हणाले की, ‘व्हाइट फंगस’ ची लक्षणे कोविड सारखीच आहेत आणि सीटी-स्कॅन किंवा एक्स-रेद्वारे संसर्गाचे निदान केले जाऊ शकते. हा रोग नखे, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू, खाजगी अवयव आणि तोंड यासारख्या शरीराच्या इतर भागात देखील संसर्ग पसरवू शकतो म्हणूनच तो जास्त धोकादायक आहे.

[ad_2]

पांढर्‍या बुरशीमुळे झालेल्या फुफ्फुसातील संसर्गाची लक्षणे HRCT मध्ये कोरोनासारखी दिसतात. अशा रुग्णांमध्ये रॅपिड एन्टीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक येते. एचआरसीटीमध्ये कोरोनासारखी लक्षणे आढळल्यास रॅपिड अँटीबॉडी टेस्ट आणि फंगससाठी म्युकसचे कल्चर करणे आवश्यक आहे.

Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *