ऑपरेशन दरम्यान डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडेच का घालतात?

आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी काही ना काहा कारणा़ने रुग्णालयाला भेट दिली असेलच. रुग्णालयामध्ये तुम्ही डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॅायला बऱ्याचदा सफेद रंगाच्या कपड्यात पाहिले असाल. परंतु जेव्हा हे डॉक्टर आणि परिचारिका रूग्णाचे ऑपरेशन करायला जातात तेव्हा ते हिरवे किंवा निळे कपडे घालतात. ते हिरवे किंवा निळे कपडेच का घालतात याचा कधी विचार केला आहे का?

ते लाल, पिवळे, काळे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे का घालत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही आपल्याला देणार आहोत.

ऑपरेशन दरम्यान, रक्ताचा लाल रंग बराच काळ बघावा लागतो
ऑपरेशन थिएटरमध्ये हिरवे आणि निळे कपडे घालण्याचे एक मोठे कारण आहे, ते म्हणचे रक्ताचा लाल रंग. डॉक्टरांना बऱ्याचदा एक शस्त्रक्रिया करण्यास खूप तास लागतात. त्यांमुळे ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांना बऱ्याच काळासाठी रक्त पाहावे लागते. अशा परिस्थितीत, बराच वेळ लाल रंग दिसल्यामुळे मानवी डोळ्यांवर खूप ताण पडतो. अशा परिस्थितीत डॉक्टर ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे ते ऑपरेशन दरम्यान हिरव्या किंवा निळ्या कपड्यांवर नजर पडल्याने त्यांना आराम मिळतो.

हिरवा आणि निळा रंग डोळ्यांचा त्रास कमी करतो.

बर्‍याच लोकांच्या मनात मग असे ही प्रश्न उद्भवतात की, ऑपरेशन दरम्यान मग हिरवे किंवा निळे कपडे न घालता पांढरे कपडे का घालत नाहीत. यामागील एक कारण असे आहे की, ऑपरेशन दरम्यान पांढरे कपडे घातले जात नाहीत. पूर्वीच्या शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टर फक्त पांढरे कपडे घालत असत. पण सन 1914 मध्ये एका नामांकित ज्येष्ठ डॉक्टरने ऑपरेशन दरम्यान पांढर्‍या ऐवजी हिरवे कपडे परिधान केले. त्यानंतर, लोकं ऑपरेशन दरम्यान हिरव्या रंगाचे कपडे घालू लागले.

खरेतर बराच काळ लाल रंग पाहिल्यानंतर, जेव्हा आपली नजर पांढर्‍या रंगावर पडते तेव्हा देखील डोळ्यांना त्रास होऊ लागतो. त्यावेळी पांढर्‍या रंगासह आपल्याला आणखी बरेच रंग दिसतात. अशा परिस्थितीत डॉक्टर ऑपरेशनवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असतात. हेच कारण आहे की ऑपरेशन दरम्यान डॉक्टर फक्त हिरवे किंवा निळे कपडे घालतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *