NTPC Jobs 2021: इंजिनीअर्ससाठी एनटीपीसी मध्ये भरती, मेरिट आणि गेट स्कोरच्या आधारे होणार निवड

[ad_1]

NTPC Engineer Vacancy 2021:

इंजिनिअर असाल तर भारत सरकारच्या महारत्न कंपनीमध्ये NTPC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीसाठी कुठलाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेपर नाही.

NTPC Engineer Vacancy 2021 ची अर्ज प्रक्रिया, अधिकृत जॉब नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत.

पदाचे नाव – इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (NTPC Engineering Executive Trainee)

एकूण पदांची संख्या : २८०

शाखा  : इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रूमेंटेशन

वेतन : ४० हजार ते १.४० लाख रुपये मासिक पर्यंत (हा बेसिक पे आहे. संपूर्ण वेतन अन्य भत्त्यांसह मिळेल.)

कसा करायचा अर्ज :
एनटीपीसी करियर (NTPC Career) ची वेबसाइट ntpccareers.net वर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म (NTPC EET application form) भरायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  १० जून २०२१

अर्जाची फी :

  • जनरल, ओबीसी आणि EWS साठी ३०० रुपये
  • अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया मोफत आहे.

पात्रता (Eligibility)

  • मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक.
  • गेट स्कोर (GATE score) देखील मागवण्यात आला आहे.

वयोमर्यादा
कमाल वय वर्ष २७ हवे. आरक्षित प्रवर्गांमधील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

निवड प्रक्रिया : एज्युकेशनल मेरिट आणि गेट स्कोरच्या आधारे निवड करण्यात येईल.

नोटिफिकेशन : Download 

इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक  : Website 

[ad_2]

Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *