पावसामुळे वीज गेली असल्यास काय करावे अथवा करु नये, जाणून घ्या सविस्तर…

Electricity Safety Tips: वीज गेली असल्यास काय करावे अथवा करु नये, जाणून घ्या सविस्तर

पावसाळा सुरु झाला की वीज जाण्याची (Power Cut) समस्या अनेकदा निर्माण होते. विशेषत: खेड्यापाड्यात वीज चमकली, ढगांचा गडगडाट झाला की ताबडतोब वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अशा वेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा ब-याच जणांचा वीज गेल्यानंतर गोंधळ उडतो आणि या परिस्थितीत त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. वीज गेल्यावर काय करावे अथवा काय करु नये हे समजविण्यासाठी महावितरणाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवरुन याबाबत माहिती दिली आहे.

वीज गेल्यावर गोंधळून न जाता काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर कुठलाही अनर्थ घडणार नाही. त्यासाठी जाणून घ्या वीज गेल्यावर काय करावे अथवा करु नये.

वीज गेल्यावर काय करावे?

1. सर्वात आधी सर्व विद्युत उपकरणांचे मेन स्विच बंद करा.

2. वीज आल्याचे कळावे म्हणून एक लाईट अथवा पंख्यांचे बटन सुरु ठेवा

3. मोबाईलची बॅटरी वाचवा.

4. खूप वेळा झाला असेल तर वीज गेल्याची तक्रार करा

वीज गेल्यावर काय करु नये?

1. पाण्याच्या संपर्कात आलेल्या वायरला हात लावू नका

2. आपण खोलीत नसताना मेणबत्ती लावू नका

3. जनरेटर, बार्बेक्यू, बत्ती आणि बाहेर वापरण्याची उपकरणे घरात वापरू नका

[ad_2]

4. वीज आल्यावर त्वरित विद्युत उपकरणे सुरु करु नका.

वर दिलेल्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतल्यास तुम्हाला वीज गेल्यावर काही अडचण येणार नाही.

Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *