सीबीएसई (CBSE), आयसीएस(ICSE)आणि इतर राज्य बोर्डद्वारे बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता नीट 2021 (NEET)परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात (NEET Exam Cancel)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
तमिळनाडू (Tamil Nadu)चे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन (MK Stalin)यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राचा फोटो त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.
मी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नीट आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन बारावीची परीक्षा रद्द झाली. ही बाब प्रवेश परीक्षांना देखील लागू होते असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
मेडिकल प्रवेश कसे ?
बारावीच्या गुणांनाच उच्च शिक्षणाचा आधार बनवायला हवे. आम्ही देखील राज्यातील करोना परिस्थिती पाहून बारावीची परीक्षा रद्द केली. आमच्या राज्यातील सर्व प्रोफेशनल आणि इतर महाविद्यालय प्रवेश बारावीच्या आधारावर घेतले जाणार आहेत.
विद्यार्थी, शिक्षक, पालक, मेडीकल प्रोफेशनल्सची मोठी संख्या पाहता हा निर्णय घेतल्याचे स्टॅलिन म्हणाले.
सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रोफेशनल कोर्ससाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. त्यामुळे नीट परीक्षेसारख्या इतर सर्व राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी स्टॅलिन यांनी केली.सर्व प्रोफेशनल कोर्सेसच्या सीट्ससाठी बारावीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करावे असेही त्यांनी पत्राच्या माध्यमातून सुचविले.
Reference : Source link