शिवचरित्र भाग – 8 (अफजलखानाचा वध)

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील लेखात आपण स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त पहिला. तरी या लेखात आपण शिवरायांनी अफजल खानचा केलेला वध पाहणार आहेत. तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.

आदिलशाहीच्या नाकीनऊ :-

शिवरायांच्या हालचाली जास्तच वाढल्या. आता आदिलशहाला आपल्या राज्याची चिंता वाटू लागली. कारण मुघलांची सत्ता दक्षिणेत पूर्णपणे पसरली नव्हती परंतु शिवाजी महाराजांनी संपूर्ण लक्ष आदिलशाही किल्ल्यावर दिले होते.

आदिलशाही दरबारात आदिलशहाच्या आईने म्हणजे बड्या बेगमसहीबा यांनी प्रश्न मांडला ‛ कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त ?’ दरबारात पूर्ण शांतता झाली. तेवढ्यात एक धिप्पाड सरदार उठला व त्याने शिवाजीला पकडून आणण्याचा विडा उचलला. तो म्हणजे अफजल खान ..

अफजल खान :-

विजापुर सल्तनतच्या अली आदिल शाह दुसराच्या काळात अफझल खान एक प्रमुख सरदार होता. त्याच्या सशक्त कौशल्याने आणि हुकमती क्षमतेने त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्याने दरबारात उच्चपद प्राप्त केले. असे म्हटले जाते की त्याला अदिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध तलवारीने सन्मानित करण्यात आले होते, ही तलवार हिऱ्यांनी भरलेली होती. अफजल खानला “ढाल-गज” नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अंबारी देण्यात आली होती. त्याने १०,००० सैनिकांची वैयक्तिक फौजेचे नेतृत्व केले.

अफजलखान स्वराज्याच्या भूमीत :-

१६५९ मध्ये, अफझलखानने १०,००० हून अधिक सैन्य उभारले आणि शिवाजी महाराजांचा सातत्याने पाठपुरावा केला. ह्या सैन्याने अनेक जणांची कत्तल केली, यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्याला डोंगराळ किल्ल्यांत आश्रय घ्यावा लागला. शिवाजी महाराजांना खुल्या मैदानात येणे भाग पडावे, याकरता त्याने हिंदूंच्या अनेक पवित्र स्थळांची नासधूस केली. त्यांमध्ये मराठ्यांचे महत्त्वाचे तीर्थस्थान पंढरपूरचा व तुळजापूरचा सुद्धा समावेश होता. विजापुरी सैन्याचे असे वागणे हे प्रथमच घडत होते, ज्यामुळे आदिलाशहाला देशमुखांशी (वतनदार) वैर पत्करावे लागले.

विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला.

महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाचीकर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.

वाटचाल वाटाघाटीकडे :-

खानाला समजले की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. खान या गोष्टीमुळे जास्तच चिडला त्याला माहित होते या भागात जाणे म्हणजे खूप कठीण आहे. कारण या भागात घनदाट जंगलउंच उंच डोंगर आहेत. म्हणून त्याने शिवरायांना पत्र लिहिले.

तुम्ही माझ्या मुलासारखे . तुमचे वडील व आमचे संबंध भावा प्रमाणे आहेत. तुम्ही आम्हाला आमचे किल्ले माघारी द्या. आम्ही तुम्हाला आदिलशहाच्या दरबारात सरदारकी देऊ. ’ शिवरायांना या पत्रामागे असेल उद्देश समजला परंतु त्यांना या मध्ये एक संधी दिसून आली. त्यांनी या पत्राला प्रतिउत्तर दिले. ‛ खांसाहेब मी तुमचा अपराधी आहे. मी किल्ले परत देतो . मला क्षमा करावी व आपणच प्रतपगडाच्या खाली येऊन आम्हाला भेटावे . मला तिकडे येण्यासाठी भीती वाटते . ’ या पत्रानंतर खान खुश झाला. त्याला या माघचं खर उद्देश समजला नाही. तो खूप आनंदात शिवरायांना प्रतापगडाखाली वाटाघाटीची चर्चा करण्यासाठी  भेटायला तयार झाला.

भेट ठरली :-

प्रतापगडाच्या माचीवर खानराजे यांची भेट होणार ही गोष्ट आता उघड झाली. दिवस , वेळ व भेटीचे नियम ठरले. आपल्या सोबत फक्त 10 अंगरक्षक , एक सेवक व वकील आणण्यास परवानगी होती. खानाने सर्व अटी मान्य केल्या. राज्यांनी खानासाठी मोठा शामियाना उभारून ठेवला. आपले सर्व सैन्य त्यानी वेगळ्या वेगळ्या तुकड्यांची विभाजित केले. प्रत्येक तुकडीची जागा नेमून दिली. सर्व तयारी एकदम विचारानेठाम निर्णय घेऊन केली. खानाची भेट घेऊ नये असे अनेक जणांनी राजांना सुचवले परंतु शिवरायांनी ठाम निर्णय घेतला होता.

किल्ले प्रतापगड ..

भेटीच्या दिवशी भवानी मातेचे दर्शन घेऊन शिवरायांनी आपला पोशाख चढवला. अंगात चिलखत त्यावर जरीचे कपडेअंगरखा घातला. डोक्यास जिरेटोप व त्यास मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली व त्याच हाताच्या अस्तिनात बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला व शिवराय खानच्या भेटीला सज्ज झाले.

सोबतीला वकील पंताजी गोपीनाथजिवा महाल , संभाजी कावजी , येसाजी कंक , कृष्णाजी गायकवाड , सिद्धी इब्राहिम हे अंगरक्षक घेतले. बाकीच्या मावळ्यांना आपल्या आपल्या जबाबदाऱ्या दिल्या व खानच्या भेटीला निघाले . खान राजांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. शेजारी सय्यद बंडा हा अंगरक्षक होता. त्याला बघून शिवराय शामियांच्या दारात थांबले. खानाने विचारले असता वकील बोलू लागले की सय्यद बंडा यांची राजांना भीती वाटते. बंडा याला बाहेर जाण्याचे आदेश देऊन खान राजांना म्हणला ‛या राजे ! भेटा आम्हाला…’

अन झटापट झाली :-

धिप्पाड खानापुढे राजे ठेंगु वाटत होते. खानाने त्यांना गळेभेट देण्याच्या उद्देशाने पुढे येऊन त्यांना आपल्या बगलेत दाबले व उजव्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. राजांचा अंगरखा टरकन फाटला. आता दोघांनीही एकमेकांचा डाव ओळखला होता. राजांनी चपळपणाने खानच्या पोटात वाघनख्यांचा वार केला. बिचवा काढुन खानच्या पोटात खुपसला. खान कोसळला परंतु तरी तो गतप्राण झाला नाही. तेवढ्यात खानचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांच्या चेहऱ्यावर वार केला. परंतु शिवरायांनी त्याला पट्ट्याच्या वारात ठार केले. हा खणखणाट ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसला व त्याने दंडपट्टाने राज्यांवर वार केला परंतु हा वार राजांपर्यंत येण्याअगोदर जीवा महाल यांनी आपल्या शरीरावर झेलला व दुसऱ्याच क्षणात सय्यद बंडाला आपल्या पट्टाने वार करून ठार केले. या दिवसानंतर ‛ होता जीवा म्हणून वाचला शिवा ’ ही म्हणच रूढ झाली.

दाणादाण खानाच्या फौजेची :-

खान आपल्या पालखीत बसून पळून जाऊ लागला. संभाजी कावजीने पालखी वाहून नेणाऱ्या भोयांचे पायच कापलेखानाला बाहेत काढून त्याचे मुंडके छाटले. आता राजे गडावर पोहचलेतोफांचे बार दिले. बार हवेत मिळतात तोच मराठा सैनिक विविध मोर्च्यांवर खानाच्या सैन्यावर तुटून पडले. बाजी सर्जेराव , कान्होजी जेध , बांदल बंधू , त्रंबक भास्कर या मराठा सरदारांनी जीवाची बाजी लावली. खानाची सर्व सेना आपला जीव वाचवावा की लढावे की पळावे काही सुचलेच नाही. खानाच्या सर्व सेनेची दाणादाण उडाली. या सर्व धांदलीत खानाचा मुलगा फत्तेखान मात्र सुटून पळाला.

खानाची व खानाच्या सेनेची झालेली ही परिस्थिती विजापूरला समजली. आता मात्र आदिलशहाचा जीव मुठीत आल्यासारखे झाले. आपल्या एवढ्या बलाढ्य सरदाराची झालेली अवस्था पाहून दरबारात सुद्धा हाहाकार उडाला.

पुढील लेखात आपण लढा घोडखिंडीतला पाहणार आहोत. तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत…

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *