भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -2 ( Indian rivers and river system part -2)

भारतीय नद्याची व नदी प्रणालीची ओळख आपण मागच्या लेखात करून घेतली आहे . या लेखात आपण हिमालयीन नद्या व सिंधू नदी प्रणाली बद्दल जाणून घेणार आहेत .

हिमालयीन नद्या ( Himalayan Rivers ):-

हिमालयातून उत्त्पन्न होणाऱ्या नद्या या हिमालयीन नद्या म्हणून ओळखल्या जातात . उत्तर भारतात या नद्यांचे महत्व खूप जास्त आहे कारण या नद्या मुख्यतः पंजाब , हरियाणा, उत्तरप्रदेश , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यातून वाहतात . या राज्यात होणाऱ्या शेती , व्यापार यांमध्ये या नद्यांचा मोठा वाटा आहे. याचं राज्यामध्ये लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे . याचे महत्वाचे कारण उत्तर भारतातून वाहणाऱ्या नद्या व त्यामुळं त्यांच्या सोबत वाहून आलेला गाळ आहे. या कारणामुळे राज्यांतील जमीन अत्यंत उपजाऊ आहे.

उत्तर भारतात लोकजीवनावर हिमालयीन नद्यांचा मोठा प्रभाव आहे. मुख्य भारतीय तीर्थक्षेत्र हे गंगा , यमुना या नद्यांच्या किनारी आहेत. ज्यामुळे भारतातील लोकांच्या मनावर नद्यां पवित्रतेचे प्रतीक म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. या लेखात आपण सिंधू नदी प्रणाली बद्दल जाणून घेणार आहोत.

सिंधू नदी प्रणाली ( The Indus drainage system) :-

सिंधू नदी व तिच्या उपनद्या यांचे चित्रण..

भारतीय उपखंडातील सर्वात महत्वाचे नदीप्रणाली पैकी एक म्हणून सिंधू नदीचा उल्लेख येतो. भारताला हिंदुस्थान व इंडिया(India) हे नाव याच नदीवरून पडले होते. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती याच नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात होती. भारतीय उपखंडातील समाजावर सिंधू नदीचा मोठा प्रभाव आहे. ही नदी मुख्यतः भारताच्या उत्तरेतून काश्मिर मधून वाहते व गिलगिट बालचीस्थान भागातून पाकिस्तान मध्ये जाते.

उगम(Origin ) :- सिंधू नदीचा उगम कैलास पर्वताजवळ उत्तर दिशेला ‛ बोखर च्यु ’ या हिमनदीपासून पश्चिम तिबेटमध्ये होतो.

नदीचा प्रवाह(Flow of river):- सिंधूचा उगम तिबेटमध्ये होतो. काराकोरम , लडाख , झास्कर आणि हिमालय या पर्वतरांगांच्या उतारावरून सिंधू नदी वाहते. तिबेटमध्ये सुमारे 250 किमी प्रवास केल्या नंतर सिंधू भारतात प्रवेश करते. भारतामध्ये लडाख मधून वाहत जाते. भारतात काराकोरम पर्वत रांगेच्या दक्षिणेकडून वाहते व गिलगिट- बाल्टिस्थान भागातुन पाकिस्तानच्या मैदानात मध्ये जाते. भारतातील लेह हे शहर सिंधू नदीच्या किनारी वसले आहे.

पूढे पाकिस्तान मध्ये सिंधू नदी खूप मोठ्या मैदानी प्रदेशातून वाहते. सिंधू पाकिस्तान मधील सर्वात लांब व राष्ट्रीय नदी( National river of pakistan) आहे. सिंधू नदी पाणी वाहून नेण्याच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या नद्यांमधील एक आहे. पाकिस्तान मध्ये मिठाणकोट येथे पंचनध प्रवाह मिळतो. या प्रवाहाला पंचनध म्हणायचे कारण म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सिंधूच्या उपनद्या एकत्र येऊन हा प्रवाह तयार करतात. येथील भूभागाला पंजाब म्हणून ओळखले जाते. याच्यामागचे पण हेच कारण आहे.

सिंधू नदीची एकूण लांबी जवळपास 2900 किमी आहे . परंतु यातील फक्त 710 किमी भारतातून प्रवाह जातो. परंतु पाकिस्तान मधून जवळ पास 2000 किमी प्रवाह जातो. या कारणामुळेच या नदीला पाकिस्तानची जीवनवाहिनी नदी म्हणले जाते. शेवटी सिंधू नदी कराची शहराच्या दक्षिणेला त्रिभुज प्रदेश तयार करून अरबी समुद्रात जाऊन मिळते.

सिंधू नदीचे विहंगत दृश्य ..

उपनद्या ( Tributries):-

  • झेलम
  • चिनाब
  • रावी
  • बियास
  • सतलज
  • झास्कर
  • श्योक
  • नुब्रा
  • गिलगिट
  • हुंजा
  • आदि….

आता आपण जाणून घेऊ सिंधू नदीच्या काही महत्वाच्या उपनद्यांबद्दल ….

झेलम:-

उगम( Origin ):-व्हेरिइंग , कश्मीर झेलम ही पंजनध नद्यांपैकी एक आहे. या नदीची सरासरी लांबी 725 किमी आहे. लिडार , सिंद , पोहरू , किशनगंगा , वुलर सरोवरामधून प्रवास करते. पुढे पिरपंजाल रांगामधून जाऊन पाकिस्तान मध्ये प्रवेश करते.

चिनाब:-

उगम(origin ):- बारा -ला – चा खिंड , हिमाचल प्रदेश सिंधू नदीची आकारमानाने म्हणजेच पाणी वाहुन नेण्याच्या दृष्टीने सर्वात मोठी उपनदी आहे. ही नदी दोन प्रवाहांची मिळून तयार होते. चंद्र व भागा असे या प्रवाहांची नावे आहेत .

रावी:-

उगम ( origin ):- रोहतांग खिंड , हिमाचल प्रदेश उगमापासून पिरपंजाल व धवलधर या रांगेतून वाहते.पंजाब मैदानानंतर काही अंतरासाठी भारत – पाकिस्तान सीमेवरून चालते.

बियास:-

उगम ( origin ):- रोहतांग खिंड , हिमाचल प्रदेश कुलू – मनाली या भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या शहरांमधून वाहते. ही नदी सतलज नदीची उपनदी आहे. पंचनध नद्यांपैकी फक्त बियास नदी भारतातून वाहते. पर्वत , दुरुला , सैज , तीरथान या घळयांमधून धवलधर पर्वत रांग ओलांडते.

सतलज :-

उगम (origin ) :- राकस सरोवर , तिबेट भारतात येण्याआधी सिंधू सोबत चालते. स्पिती हा जिल्हा या नदीच्या पात्रावर वसला आहे. भारतातील प्रसिद्ध भाकरा – नांगल प्रकल्प या नदीवर आहे.

या नद्यां सोबत झास्कर , गिलगिट , नुब्रा , श्योक या उपनद्या आहेत. परंतु या भारताच्या एकदम उत्तर टोकाला ( southern most side) आहेत. सोबतच या नद्या खूप महत्वाच्या नाहीत.त्यामुळे यांचा आपण अभ्यास करत नाही.

या लेखात आपण वाचले आहे सिंधू नदी व सिंधू नदी प्रणाली बद्दल . पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत गंगा नदी व गंगा नदी प्रणाली बद्दल ….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *