घरबसल्या जाणून घ्या, चटकदार दहीवडा बनवण्याची पद्धत !!

आजच्या या काळात घरी बसून सगळेच खूप कंटाळले आहेत , याचे एक मुख्य कारण म्हणजे आपला बाहेरच्या चटकदार पदार्थांपासून आलेला दुरावा हे आहे . तर STAY UPDATED आपल्यासाठी घेऊन आले आहे विविध चटकदार पदार्थ घरी बनवण्याच्या पाककृती ( RECIPIES ) …. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत चटकदार दहिवडा बनवण्याची पद्धत …

आपण या लेखात सुरवातीला जाणून घेणार आहेत की दहिवडा बनवण्यासाठी कोणती सामग्री हवी असते .

सामग्री ( MATERIAL ):-

  • दही – 500 ग्रॅम
  • उडदाची डाळ – 100 ग्रॅम
  • मुग डाळ –  50ग्रॅम
  • जीरा पावडर – 1/2टी स्पून
  • मीठ मसाला – 1/2टी स्पून
  • हळदी – 1/2टी स्पून
  • हिंग – 1/2टी स्पून
  • कश्मिरी मिरची पावडर – 1/2टी स्पून
  • लसहन अदरकाची पेस्ट
  • चाट मसाला – 1/2टी स्पून
  • हिरवी मिरची – 2/3 स्पून
  • काळे मीठ – 1/2टी स्पून
  • चिंचेची गोड चटणी
  • कोथंबीर
  • लसहन अदरकाची पेस्ट – 1/2टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल तळण्यासाठी
  • पाणी

वरीलप्रमाणे सर्व सामग्री मध्ये आपण 8 – 10 वडे बनवू शकतो .आता आपण जाणून घेऊ अनुक्रमे (STEPWISE) दहिवडा बनवण्याची पद्धत…

चटकदार दहिवडा ..

कृती ( ACTION ) :-

1) एका भांड्यात दही घ्या, दह्यामध्ये जिरा पावडर, चाट मसाला,कश्मिरी मिरची पावडर, मिठा मसाला टाकून भेटून घ्या. गुठळी राहू देऊ नका , कारण वड्यावर दही नीट पसरले पाहिजे.तयार झालेल्या मिश्रणाला फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्या.

2) सर्वप्रथम उडदाच्या डाळीचा साफ करून पाच ते सहा तास भिजत घाला.आता डाळीमधले पाणी काढून एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. मात्रा अनुसार पाणी घालून डाळीचे घट्ट आणि बारीक मिश्रण तयार करा.कोथिंबिर , हिरवी मिरची , लसणाची पेस्ट तयार करा.

3) बारीक  केलेल्या डाळीमध्ये मिठा मसाला, जिरा पावडर, हिंग, हळद, चवीनुसार मीठ, काश्मिरी मिरची पावडर, लसणाची पेस्ट, बारीक केलेली कोथिंबीर घाला. मात्रा नुसार पाणी टाकून तयार झालेल्या मिश्रणाला घट्ट मिश्रण तयार करून घ्या. 

4) तयार केलेल्या गोव्याला तीस मिनिटे ओल्या कपड्यात झाकून ठेवा.आता डाळीचे दहा ते पंधरा ग्रॅम चे गोळे तयार करा आणि तयार केलेल्या गोळ्यांना वड्याचा आकार द्या.

5) कढईमध्ये वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर अलगत वड्यांना तेलामध्ये सोडा, मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर वडे तेलात तळा.

6) मिनिटांनंतर वडे दोन्ही हातांच्या तळव्यांत अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकावे . वडे तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी नंतर हे वडे वाढेपर्यंत ताकात भिजवून ठेवावेत.

7) अशाप्रकारे सर्व वडे तळून क्रमाक्रमाने पाण्यात व नंतर ताकात भिजवून ठेवावेत.

8) दही वडे सर्व करताना , प्रथम ताकात बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर थंड दही घालावे , मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर आणि चाट मसाला भुरभुरावा , आवडीप्रमाणे हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून थंड खावयास द्यावे! आवश्यकतेनुसार कोथिंबीर टाका.

वरील कृती क्रमाने करून तुम्ही घरी बसुन अतिशय चविष्ट दहीवडा तयार करून त्याचा स्वाद घेऊ शकता व आपल्या परिवाराला घरी बसून चटकदार दहिवड्याची मेजवानी देऊ शकता .

टीप ( NOTE ):-

  1. वड्याची एक बॅच तळण्यासाठी किमान सहा ते आठ मिनिटे लागतात.
  2. दह्याची गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या.
  3. मिश्रण जितके चांगले एकत्र होईल तितके वडे कापसासारखे मऊ आणि हलके नाहीतर खूप जड होतात .

तरी या लेखात आपण जाणून घेतले चटकदार दहिवडा घरी बनवण्याची कला . आपल्याला दहिवडा बनवण्याची पाककृती कशी वाटली या बद्दल प्रतिक्रिया आम्हाला COMMENT मध्ये कळवा व अगदी असल्याचं नवनवीन पाककृती जाणून घेण्यासाठी वाचत रहा फक्त STAY UPDATED …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *