Indian premier league( गोष्ट जगातील सर्वात प्रसिद्ध T-20 लिगची ..)

आय.पी.एल.(IPL) ही भारतातील टी-20 क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरवात 2008 साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) केली होती. आता ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महत्वाची क्रिकेट स्पर्धा झाली आहे. जगातील सर्वात उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळाडू या स्पर्धेत खेळतात.

आय.पी.एल. जगातील सर्वात अवघड टी-20 क्रिकेट स्पर्धा म्हणून नावाजली आहे. याचे मुख्य कारण या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा दर्जा आहे. IPL सुरू करण्याचे खरे श्रेय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) 2008 सालच्या कार्यकारी अध्यक्ष ललित मोदी यांना दिला जातो. त्यांनी 2008-2010 मध्ये IPL चे अध्यक्ष व CHAMPION TROPHY ( चॅम्पियन ट्रॉफी) चे बोर्डचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्यस्तिथीत मुख्यालय मुंबई या ठिकाणी असून BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे IPL चे चेयरमन म्हणून काम पाहत आहेत.

2008 मध्ये IPL चा पहिला सामन रॉयल चाललेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाइटरायडर्स यांच्यात झाला होता आणि ह्या सामन्यांतच जगाला हे समजून आले होते की IPL ही कोणत्या दर्जाची स्पर्धा होणार आहे. याचे कारण म्हणजे पहिल्याच सामन्यात ब्रॅंडन मकलम या न्युझिलँड च्या खेळाडूने 158* रनाची खेळी केली.IPL मध्ये मुख्यतः 8 संघ साखळी स्पर्धेमध्ये खेळतात . या पैकी 4 संघ सेमीफायनल मध्ये जातात व यांपैकी एक विजेता होतो. पुढे आपण जाणून घेऊ IPL मधील संघ व संघ मालक यांची यादी आहे .

पहिल्या IPL चा लिलाव फेब्रुवारी 2008 मध्ये झाला होता.राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले .आयकॉन खेळाडूंना त्या-त्या संघात सर्वांत महाग बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा १५% अधिक रक्कम द्यावी लागेल. स्पर्धेचे तसेच संघ निर्माण करण्याचे नियम बनवण्यात आले. या कारणमुळे संघ मालकांना व संघ व्यवस्थापकाना संघ निर्मिती करण्यास जास्त अडचणी आल्या नाही. खाली त्या नियमाची यादी दिली आहे .

संघ बांधणीचे काही नियम :-

 • संघात किमान १६ खेळाडू आणि एक संघ फिजियो व एक संघ प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक संघात किमान ८ स्थानिक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
 • संघात ८ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू व खेळताना ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवले जाऊ नयेत.
 • २००९ पासून परदेशी खेळाडूंची संख्यामर्यादा १० करण्यात आली आहे.

खेळाडूला संघात सामावुन घेण्याचे नियम :-

 • वार्षिक खेळाडू लिलावातून खेळाडू संघात घेणे.
 • इतर संघातील भारतीय खेळाडूंना ‘विकत’ घेऊन.
 • कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन.
 • इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून.
 • असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन.

IPL संघ व संघ मालक :-

 • मुंबई इंडियन्स (MUMBAI INDIANS) : मुकेश अंबानी
 • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( ROYAL CHALLENGERS BANGLOR ) : विजय मल्ल्या
 • चेन्नई सुपेरकिंगस ( CHENNAI SUPERKINGS) : एन. श्रीनिवासन
 • सनराईसर्स हैद्राबाद ( SUNRISERS HAIDRABAD ) : सन TV नेटवर्क
 • कोलकत्ता नाईटरायडर्स ( KOLKATTA NIGHTRIDERS ) :- शाहरुख खान
 • दिल्ली कॅपिटल्स ( DELHI CAPITALS ) : एम. आर. होल्डिंग्स
 • किंगस XI पंजाब ( KINGS XI PANJAB ) : प्रीती झिंटा , नेस वाडिया
 • राजस्थान रॉयल्स ( RAJYSTHAN ROYALS ) :- मनोज वडाले , सुरेश चेलराम

या संघान व्यतिरिक्त पुणे सुपेर्जाइंट्स , गुजरात लायन्स , कोची टस्करस केरळ , डेक्कन चार्जेरस , पुणे वॉरियेर्स हे संघ काही वर्ष IPL खेळले. 2012 ह्या वर्षी IPL मध्ये 9 संघांनी सहभाग घेतला होता . या व्यतिरिक्त बाकी सर्व वर्षी 8 संघ IPL मध्ये सहभाग घेतात.

IPL मध्ये संघ तसेच विविध खेळाडूंना वेगवेगळे पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. या पुरस्कारांमध्ये IPL विजेता ( IPL WINNER) , फेअर प्ले अवॉर्ड ( FAIR PLAY AWARD ) , ORANGE CAP ( सर्वात जास्त रन करणार खेळाडू ) , PURPLE CAP ( सर्वात जास्त विकेट्स घेणार खेळाडू ) ,प्लेअर ऑफ टूरनामेंट( PLAYER OF TOURNAMENT) , एमर्जिंग प्लेअर अवॉर्ड ( EMERGING PLAYER AWARD ) हे पुरस्कार मुख्य आहेत. IPL सुरू झाल्या पासून कोणत्या संघाने व खेळाडूने जिंकलेल्या पुरस्काराची यादी खाली दिली आहे.

IPL विजेता संघ ( IPL WINNER TEAM) :-

IPL मधील सर्वात जास्त यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( 5 वेळेस विजेतेपद ) …
 1. 2008 – राज्यस्थान रॉयल्स
 2. 2009 – डेक्कन चार्जेरस
 3. 2010 – चेन्नई सुपरकिंगस
 4. 2011 – चेन्नई सुपरकिंगस
 5. 2012 – कोलकत्ता नाईटरायडर्स
 6. 2013 – मुंबई इंडियन्स
 7. 2014 -कोलकत्ता नाईटरायडर्स
 8. 2015 – मुंबई इंडियन्स
 9. 2016 – सनराईसर्स हैद्राबाद
 10. 2017 – मुंबई इंडियन्स
 11. 2018 – चेन्नई सुपरकिंगस
 12. 2019 – मुंबई इंडियन्स
 13. 2020 – मुंबई इंडियन्स

फेअर प्ले अवॉर्ड ( FAIR PLAY AWARD):-

 • 2008 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2009 – किंगस XI पंजाब
 • 2010 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2011 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2012 – राजस्थान रॉयल्स
 • 2013 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2014 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2015 – चेन्नई सुपरकिंगस
 • 2016 – सनराईसर्स हैद्राबाद
 • 2017 – गुजरात लायन्स
 • 2018 – मुंबई इंडियन्स
 • 2019 – सनराईसर्स हैद्राबाद
 • 2020 – मुबंई इंडियन्स

सर्वात जास्त रन करणारा खेळाडू ( ORANGE CAP ):-

 • 2008 – शॉन मार्श ( KXIP )
 • 2009 – मॅथु हेडेन ( CSK )
 • 2010 – सचिन तेंडुलकर ( MI)
 • 2011 – ख्रिस गेल ( RCB)
 • 2012 – ख्रिस गेल ( RCB)
 • 2013 – मिचेल हसी ( CSK )
 • 2014 – रॉबिन उथप्पा ( KKR)
 • 2015 – डेव्हिड वॉर्नर ( SRH)
 • 2016 – विराट कोहली ( RCB)
 • 2017 – डेव्हिड वॉर्नर ( SRH)
 • 2018 – केन विल्लीमसन ( SRH)
 • 2019 – डेव्हिड वॉर्नर ( SRH)
 • 2020 – के. एल. राहुल ( KXIP)

सर्वात जास्त विकेट्स घेणारा खेळाडू (PURPLE CAP ) :-

 • 2008 – सोहिल तन्वीर ( RR )
 • 2009 – आर. पी. सिंग ( DC)
 • 2010 – प्रज्ञान ओझा ( DC)
 • 2011 – लसिद मलिंगा ( MI)
 • 2012 – मॉर्नि मॉरकल (DD)
 • 2013 – डेविन ब्रावो (CSK)
 • 2014 – मोहित शर्मा ( CSK)
 • 2015 – डेविन ब्रावो (CSK)
 • 2016 – भुवनेश्वर कुमार ( SRH )
 • 2017 – भुवनेश्वर कुमार ( SRH )
 • 2018 -अँडरु टाई ( KXIP )
 • 2019 – इम्रान ताहीर ( CSK )
 • 2020 – खगिसो रबाडा (DC)

एमर्जिंग प्लेअर अवॉर्ड ( EMERGING PLAYER AWARD ):-

 • 2008 – श्रीनिवास गोस्वामी ( RCB)
 • 2009 – रोहित शर्मा ( DC)
 • 2010 – सौरभ तिवारी ( MI )
 • 2011 – इकबाल अब्दुल्ला ( KKR)
 • 2012 – मंदिप सिंग ( KXIP )
 • 2013 – संजू सॅमसंग ( RR)
 • 2014 – अक्षर पटेल ( KXIP )
 • 2015 – श्रेयस अय्यर ( DD )
 • 2016 – मुस्तफिझुर रहमान ( SRH)
 • 2017 – बसिल थंपी ( GL )
 • 2018 – रिषभ पंत ( DC)
 • 2019 – शुभमान गिल ( KKR)
 • 2020 – देवदत्त पडीकन

प्लेअर ऑफ टूरनामेंट ( PLAYER OF TOURNAMENT) :-

 • 2008 – शेन वॉटसन ( RR)
 • 2009 – ऍडम गिलख्रिस्ट ( DC)
 • 2010 – सचिन तेंडुलकर ( MI)
 • 2011 – ख्रिस गेल ( RCB )
 • 2012 – सुनील नारायण ( KKR)
 • 2013 – शेन वॉटसन ( RR)
 • 2014 – ग्लेन मॅक्सवेल ( KXIP)
 • 2015 – आंद्रे रसल ( KKR)
 • 2016 – विराट कोहली ( RCB)
 • 2017 – बेन स्टोक्स ( RPS )
 • 2018 – सुनील नारायण ( KKR)
 • 2019 – आंद्रे रसल ( KKR)
 • 2020 – जोफ्रा आर्चर (RR)
IPL मधील सर्वात जास्त यशस्वी संघांपैकी एक असलेली चेन्नई सुपरकिंगस…

IPL च्या इतिहासात सर्वात जास्त यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स ( MUMBAI INDIANS ) ओळखला जातो. या संघाने IPL मध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. या नंतर चेन्नई सुपरकिंगस ( CHENNAI SUPERKINGS) 3 वेळा विजेते झाले आहेत. या वर्षीची IPL कोरोना महामारीच्या कारणमुळे काही दिवस उशिरा नियोजित करण्यात आली आहे आणि तिचे नियोजन UAE मध्ये करण्यात आले आहे.

टीप* :- वरील लेखात काही ठिकाणी DC असा उल्लेख आला आहे . तरी जर हा उल्लेख 2011 साली या अधीचा असेल तर तेथे डेक्कन चार्जेरस (DECCAN CHARGERS) असा अर्थ आहे व जर हा उल्लेख 2017 नंतरचा असेल तर या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्स (DELHI CAPITALS) असा आहे .

या लेखात आपण जाणून घेतले जगातील सर्वात कठीण T-20 स्पर्धेबद्दल . तरी आपल्याला आमची माहिती कशी वाटली याची प्रतिकऱ्या नक्की कळवा व अधिक माहितीसाठी वाचत राहा STAY UPDATED ..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *