नमस्कार , मागील लेखात आपण जाणून घेतले हिमालयीन नदीप्रणालीतील गंगा नदी व तिच्या मुख्य उपनद्या बद्दल . आता या लेखात आपण जाणून घेणार आहेत ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या उपनद्या बद्दल .
ब्रह्मपुत्रा नदी :-
जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश होतो . ही नदी चीन , भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . या नदीचा जगात लांबी नुसार 15 वा तर आकारानुसार 9 वा क्रमांक येतो .जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला कांचनजुंगा हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे . ही नदी मुख्यतः एका प्रवाहात वाहत नाही तर सोबत अनेक प्रवाह घेऊन वाहते . या प्रकारच्या नद्यांना ब्रेडेड नद्या ( BREADED RIVERS ) म्हणून ओळखल्या जातात .
उगम :- चेमायूनगडूनग हिमनदी , कैलास पर्वत रांग ( तिबेट )
लांबी :- 3080 किमी
ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारतातील सर्वात महत्वाची नदी आहे . या सोबतच या नदीला पुराणिक महत्वही आहे . या नदीचे जुने संस्कृत नाव लोहित्य असे आहे . तिबेट मध्ये या नदीला स्टंगपो या नावाने ओळखले जाते .
प्रवाह :-
उगम झाल्यानंतर ही नदी 1200 किमी हिमालय पर्वताला समांतर चालते . या काळात ती स्टंगपो या नावाने ओळखली जाते . नंतर अरुंद दरी बनवून पूर्णतः दक्षिण बाजूला वळते व भारतात अरुणाचल प्रदेश राज्यात येते . भारतात सुरवातीला ही नदी सिआंग या नावाने ओळखली जाते . नंतर अरुणाचल प्रदेशच्या मैदानी भागात ही नदी दिहाँग नावाने ओळखली जाते . थोडे पुढे प्रवाहित झाल्यावर दिहाँग नदीला दिबांग व लोहित्य या नद्या मिळतात व या नद्यांच्या संगमाचे नाव ब्रह्मपुत्रा असे होते .
आसामच्या मैदानात ब्रम्हपुत्रा मोठे विक्राळ रूप धारण करते . काही ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र 20 किमी पेक्षा मोठे होते . जगातील सर्वात मोठे नदी द्वीप हे भारतात ब्रह्मपुत्रा नदी तयार करते . या द्वीपचे नाव मजुली द्वीप असे आहे . या नदीचा सर्वात छोटा प्रवाह हा गुवाहाटी जवळ आहे . या भागात नदी 1 किमी इतकी निमुळती होते .
ब्रह्मपुत्रा भारतातून बांगलादेश मध्ये जाताना पुन्हा एक दक्षिणेकडे वळण घेते . ही नदी बांगलादेश मध्ये जमुना म्हणून प्रसिद्ध आहे . पुढे जाऊन ही नदी पुन्हा 2 प्रवाहांमध्ये विभाजित होते . यातील एक जमुना व एक जुनी ब्रह्मपुत्रा म्हणून प्रसिद्ध आहे . हीच नदी पुढे गंगेसोबत मिळून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात . हाच त्रिभुज प्रदेश सुंदरबन म्हणून प्रसिद्ध आहे .
ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या :-
ब्रह्मपुत्रा नदीला भारतातील ईशान्य भारतातील खूप नद्या मिळतात . यातील काही हिमालयात उगम पावतात तर काही ईशान्य भारतातील डोंगर व मैदानावर उगम पावतात .
उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :-
- सुबंसिरी
- कामेंग
- बाढ नदी
- मानस
- संकोश
- तिस्ता
डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :-
- दिबांग
- लोहित
- दिहिंग
- दीखोऊ
- धनसिरी
- कोपीली
सुरवातीला आपण पाहू ब्रह्मपुत्रा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या मुख्य उपनद्या .
1) सुबंसिरी :-
उगम :- तिबेट , चीन
ही ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे . या नदीला तेथील लोक सुवर्ण नदी असेही म्हणतात . ही नदी जगात सोन्याचे कण वाहून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे .
2) कामेंग :-
उगम :- तवांग जिल्हा , अरुणाचल प्रदेश
ही नदी पूर्व हिमालयाच्या भागातून उगम पावते . या नदीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून वाहते . याच नदीला भराली/ जिया भराली असे म्हणूनही ओळखले जाते . ही तेजपुर मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते .
3 ) बाढ नदी :-
उगम :- भूतान
ही नदी भूतान व भारत या देशांतून वाहते . भारतात येऊन आसाम मध्ये गुवाहाटी जवळ ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते .
4 ) मानस :-
उगम :- भूतान
ही नदी भारत व भूतान या देशांतून वाहते . या नदीचा उगम हिमालयाच्या पायथ्याला होतो . ही नदी भूतान मधील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे . या नदी किनारी रॉयल मानस राष्ट्रीय उद्यान व मानस वन्यजीवन अभयारण्य आहे . या कारणामुळे ही नेपाळची सर्वात महत्वाची नदी आहे .
5 ) संकोश :-
उगम :- उत्तर भूतान
ही नदी भूतान व भारत या देशांतून वाहते . उगम पावल्या नंतर ही नदी भारतात आल्या नंतर आसाम व पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा काही काळासाठी निश्चित करते .
6 ) तिस्ता :-
उगम :- तिस्ता कांगसे हिमनदी , सिक्कीम
ही नदी भारत व बांगलादेश या देशांतून वाहते .कांचनजंगा या पर्वताजवळ उगम पावल्या नंतर ही नदी सिक्कीम मधून वाहते . या नदीला सिक्कीम राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते . ही नदी काही काळ सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्याची सीमा बनवते व फुलचारी जिल्ह्यात जमुना नदीला मिळते .
आता आपण जाणून घेऊ ब्रह्मपुत्रा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या मुख्य उपनद्यांबद्दल .
7 ) दिबांग :-
उगम :- भारत- चीन सीमा , दिबांग व्हॅली जिल्हा ( अरुणाचल प्रदेश )
ही नदी या 3 नद्या मधील एक आहे ज्या मिळाल्या नंतर नदीला ब्रह्मपुत्रा असे नाव पडले . ही नदी सादिया शहराच्या जवळ आसाम मध्ये मिळते .
8 ) लोहित्य :-
उगम :- पूर्व तिबेट , ( तिबेट )
ही नदी भारत व तिबेट ( चीन ) या देशांतून वाहते . ही सुद्धा ब्रह्मपुत्रा तयार होण्यात ज्या तीन नद्या एकत्र येतात त्यातील एक आहे . सादिया शहराजवळ या नद्यांचा संगम होतो .
9 ) दिहिंग :- ( बुढी दिहिंग )
उगम :- पूर्वी हिमालय , ( अरुणाचल प्रदेश )
या नदीचे पात्र सुपारीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे . या भागात खूप मोठ्या प्रमाणात सुपारीचे उत्तपन्न होते . ही नदी देहिंगमुख , दिब्रूगढ जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीला मिळते .
10 ) दिखोऊ :-
उगम :- नागा टेकड्या , नागालँड
या नदीचा उगम नागालँड मध्ये होतो . ब्रम्हपुत्रा नदीच्या मुख्यतः सर्व उपनद्या छोट्या व डोंगराळ भागातून वाहतात . ही नदी नागालँड व आसाम या राज्यांतून वाहते .
11 ) धनसिरी :-
उगम :- लैसांग टेकड्या , नागालँड
ही नदी जगातील सर्वात जास्त वळण घेऊन वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे . ही नदी छोटी परंतु खूप महत्वाची उपनदी आहे .
12 ) कोपीली :-
उगम :- बोरेल रांग , मेघालय
या नदीला पौराणिक महत्व प्राप्त झाले आहे . या नदीचे नाव कपिल ऋषींच्या नावावरून पडले आहे .ही नदी ब्रह्मपुत्रा नदीच्या एक विभाजक कलांग कालव्याला मिळते .
तरी या लेखात आपण जाणून घेतले ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या मुख्य उपनद्या बद्दल . तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते नक्की कंमेंट ( comment )मध्ये कळवा. पुढील लेखात आता आपण प्रायद्विपीय नद्यांबद्दल जाणून घेणार आहोत . तरी वाचत राहा STAY UPDATED …