महाराष्ट्र – नदीप्रणाली

मागील लेखात आपण पहिला महाराष्ट्राचा राजनैतिक भूगोल . या लेखात आपण जाणून घेणार आहेत महाराष्ट्र राज्याची नदीप्रणाली .

महाराष्ट्रातील नद्यांची विभागणी वाहणाऱ्या दिशेनुसार होते . सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील मुख्य जलविभाजक म्हणून काम करते .त्यामुळे महराष्ट्रात नद्यांचे 2 मुख्य प्रकार पडतात. सोबतच सातमाळा – अजिंठा डोंगररांग , हरिश्चंद्र – बालाघाट डोंगररांग आणि शंभूमहादेव डोंगररांग या डोंगररांगा दुय्यम जलविभाजक म्हणून कार्य करतात . महाराष्ट्रातील नद्यांचे विभाजन खालील प्रमाणे होते .

 • पूर्ववाहिनी नद्या
 • पश्चिमवाहिनी नद्या

पूर्ववाहिनी नद्या :-

सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून दक्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतात . दक्खनच्या पठारावरून गोदावरी , भीमा आणि कृष्णा या मुख्य नद्या पूर्वेस तसेच आग्नेय दिशेस वाहतात .

गोदावरी नदीप्रणाली :-

दक्षिण भारतातील सर्वात मोटणी नदी गोदावरी असून ती पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत वाहते व नंतर ती बंगालच्या उपसागरात मिळते . गोदावरी नदीस दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखले जाते .

उगम :- गोदावरी नदीचा उगम सहयाद्री पर्वत रांगांमधील ब्रह्मगिरी टेकड्या ( त्रंबकेश्वर ) येथे होतो . त्रंबकेश्वर हे भारतातील 12 जोतिर्लिंगांपैकी एक आहे .

गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे 1465 किमी आहे व नदीप्रणाली क्षेत्र 3,13 ,000 चौ. किमी आहे .या क्षेत्रांपैकी जवळपास 49% क्षेत्र हे महाराष्ट्रातील आहे . या आकड्यांवरून आपल्याला साधारणपणे अंदाज येऊन जातो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाची नदी म्हणून गोदावरी का गणली जाते . उगम पावल्या नंतर गोदावरी नदी मुख्यतः पूर्वआग्नेय दिशेने मराठवाड्यातून वाहत जाते . उत्तरेस सातमाळा – अजिंठा डोंगररांग व दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगांनी मर्यादित झालेल्या गोदावरीस उजव्या बाजूने प्रवरा , सिंधफण मांजरा नदी मिळते . तर डाव्या बाजुने दक्षिण पूर्णादुधना या नद्या मिळतात . विदर्भातून वर्धा , पैनगंगा व वैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता नदीचे खोरे तयार होते . पुढे जाऊन हीच प्राणहिता व इंद्रावती या नद्या गोदावरीला मिळतात . महाराष्ट्रानंतर गोदावरी तेलंगाणा राज्यात प्रवेश करते नंतर तिथून ती आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश करते . शेवटी बंगालच्या उपसागराला मिळण्याअगोदर गोदावरी दोन शाखांमध्ये विभाजित होते . पहिली शाखा गौतमी गोदावरी व दुसरी शाखा वशिस्ती गोदावरी . या शाखा परत दोन-दोन शाखांमध्ये विभाजित होतात . परंतु ते खूप कमी काळासाठी कारण त्या नंतर लगेच राजमहेंद्रवरमन जवळ गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते . गोदावरी नदी सुरवातीला साधारण प्रवाह आहे परंतु नदीच्या शेवटच्या टप्प्यात गोदावरी नदी प्रसंगी पूर आणण्याचे कामही करते .

गोदावरी नदीच्या मुख्य उपनद्या :-

 • पूर्णा
 • प्राणहिता ( पैनगंगा , वैनगंगा व वर्धा )
 • इंद्रावती
 • साबरी
 • दारणा
 • प्रवरा
 • मांजरा
 • मानियार

कृष्णा नदीप्रणाली:-

कृष्णा नदी दख्खनच्या पठारावर दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे . कृष्णा नदी पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत वाहते . या नदीचे 10% क्षेत्र महाराष्ट्रात आहे .

उगम :- कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. क्षेत्र महाबळेश्वर येथे 5 नद्यांचा उगम पाहायला मिळतो . कृष्णा , वैन्ना , कोयना , गायत्री सावित्री या 5 नद्या उगम पावतात .

कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किमी आहे व या नदीचे क्षेत्र 2 ,59 ,000 चौ. किमी आहे . या पैकी फ़क्त 10% क्षेत्र हे महराष्ट्रात आहे . बाकीचे क्षेत्र हे कर्नाटक , तेलंगाणा व आंध्रप्रदेश या राज्यामध्ये विभाजित आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्याला अप्पर कृष्णा खोरे असे म्हणतात . महाराष्ट्रातील सातारा , सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या नदीचा प्रवाह जातो . कृष्णा नदीला महराष्ट्रात बहुतेक सर्व नद्या या उजव्या बाजूने मिळतात .

कृष्णा नदीच्या मुख्य उपनद्या :-

 • भीमा
 • मुशी
 • विना
 • कोयना
 • घाटप्रभा
 • मालप्रभा
 • तुंगभद्रा
 • पंचगंगा
 • दुधगंगा

भीमा नदीचे खोरे :-

भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे . परंतु या नदीने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे . म्हणून या नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो .

उगम :- भीमा नदीचा उगम हा पुण्यात भीमाशंकर येथे होतो . भीमाशंकर हे भारतातील 12 जोतिर्लिंगांपैकी एक आहे . उगम पावल्यानंतर भीमा आग्नेय दिशेने वाहते . पुणे , सोलापूर व काही प्रमाणात अहमदनगर , बीड , उस्मानाबाद सातारा या जिल्ह्यांचा भाग आपल्या खोऱ्यात सामावून घेत .

भीमा नदीची लांबी 451 किमी आहे . या नदीचे 90% क्षेत्र हे महराष्ट्रात आहे . पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसले आहे. या नदीच्या उपनद्या मुख्यतः उजव्या बाजूने मिळतात .

भीमा नदीच्या मुख्य उपनद्या :-

 • भामा
 • इंद्रायणी
 • मुळा
 • मुठा
 • नीरा
 • मान
 • सीना
 • घोड

पश्चिमवाहिनी नद्या :-

सहयाद्री पर्वतावर उगम पावून व कोकण किनारपट्टीवरून वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्यांना पश्चिमवाहिनी नद्या म्हणतात . कोकणात वैतारणा , उल्हास व सावित्री या सारख्या मुख्य नद्या आहेत . सोबतच सातपुडा पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या तापी व पूर्णा या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात . सोबतच नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करून पश्चिमेला वाहते .

तापी नदीचे विहंगत दृश्य …

तापी नदीप्रणाली :-

भारतातील पूर्वेकडून पश्चिमेला वाहणाऱ्या नद्यांपैकी एक तापी नदी आहे. दक्षिणेस सातमाळा- अजिंठा डोंगररांग व उत्तरेस सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान तापी नदी वाहते .

उगम :- तापी नदीचा उगम मुळताई येथे मध्यप्रदेश मध्ये होतो. हा भाग सातपुडा पर्वत रांगेत आहे. ही नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते.

तापी नदीची लांबी 725 किमी असून या नदीच्या संपूर्ण खोऱ्यापैकी लगभग 45% खोरे महाराष्ट्र राज्यात आहे . तापी नदीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे . या कारणामुळे ही नदी खोल दरीतून वाहते. या नदीला समांतर असा सातपुडा पर्वत आहे . तापी नदीची मुख्य उपनदी पूर्णा ही आहे . तापी ही महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मुख्यतः वाहते .

तापी नदीच्या मुख्य उपनद्या :-

 • पूर्णा
 • गिरणा
 • पांझरा
 • गोमती
 • बुराई

या नदी सोबत नर्मदा ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला थोडा भाग आपल्या क्षेत्रात घेत . परंतु हा भाग खूप थोड्या प्रमाणात आहे. सोबतच महाराष्ट्रात कोकण खोऱ्यात अनेक छोट्या नद्या आहेत . यातील मुख्य नद्या कायमवाहू नाहीत या फक्त मान्सून आल्यावर काही काळ वाहतात .

कोकण किनारपट्टीवरील छोट्या नद्या :-

 • सावित्री
 • गांधार
 • भोगावती
 • भातसई
 • उल्हास
 • सावित्री
 • घोड
 • अंबा
 • पाताळगंगा
 • कुंडलिका
 • जोग
 • काजवी

या लेखात आपण थोडक्यात महाराष्ट्रातील नद्याप्रणाली व मुख्य नद्यांबद्दल जाणून घेतले . पुढील लेखात आपण महाराष्ट्रातील मृदा व प्रकार या बद्दल जाणून घेऊ . तरी वाचत राहा STAY UPDATED …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *