या लेखात आपण जाणून घेणार आहेत महाराष्ट्राचा संक्षिप्त प्राकृतिक भूगोल.महाराष्ट्र म्हणलं तर सगळ्यात पाहिले आठवण येते ती छत्रपतींची , त्यांच्या मावळ्यांची आणि सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गड किल्ल्यांची याच महाराष्ट्राची थोडक्यात ओळख आपल्याला खालील कवितेतून होईलच . गोविंदाग्रज यांच्या या कवितेतून महाराष्ट्राचे संपूर्ण वर्णन झाले आहे .
महराष्ट्र देशा – गोविंदाग्रज
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ll
महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली . प्राकृतिक दृष्ट्या अत्यंत विविधतेने नटलेला महाराष्ट्र हा भारतातील एक समृद्ध प्रदेश आहे . सुरवातीला आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहू.
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ( PHYSICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA ):-
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे . महाराष्ट्राच्या विविध दिशांनी विविध प्राकृतिक सीमा निश्चित झाल्या आहेत . या सीमांमुळे महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग हा शेजारच्या राज्यांच्या प्राकृतिक भागापेक्षा वेगळा जाणवून येतो .
महाराष्ट्राच्या पूर्वेस( EAST) चारोळी टेकड्या व भामरागड डोंगर आहेत तर पश्चिमेस( WEST ) अरबी समुद्र आहे . उत्तरेस( NORTH) सातपुडा पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस गविलगढ टेकड्या आहेत तर दक्षिणेस( SOUTH) हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी आहे. वायव्य( SOUTH-WEST) दिशेस सातमाळा डोंगररांग , गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेमधील अक्रानी टेकड्या आहेत तर ईशान्येकडे(SOUTH – EAST) दरेकास टेकड्या आहेत. या सर्व टेकड्या , नद्या व डोंगररांगा महाराष्ट्राची प्राकृतिक सीमा निश्चित करतात .
आकार( SHAPE) :- महाराष्ट्राचा आकार मुख्यतः व्हीव्हीत्रिकोणाकृती आहे . याचा अर्थ महाराष्ट्र दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद आहे . पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात आहे .
लांबी, रुंदी व क्षेत्रफळ( LENGTH , WIDTH AND AREA) :- क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
- लांबी(LENGTH) :- पूर्व – पश्चिम = 800 किमी
- रुंदी( WIDTH) :- उत्तर – दक्षिण = 720 किमी
- क्षेत्रफळ( AREA) :- 307713 चौ. किमी
- समुद्रकिनारा( SEA COAST ) :- 720 किमी
महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या मुख्यतः 3 भाग पडतात . तरी आपण थोडक्यात त्यांच्या बद्दल जाणून घेऊ .
- कोकण किनारपट्टी ( KOKAN COSTAL LINE )
- सह्याद्री पर्वतरांग / पश्चिम घाट ( WESTERN GHATS )
- दक्खचे पठार / महाराष्ट्र पठार ( MAHARASHTRA PLATEAU )
कोकण किनारपट्टी( KOKAN COSTAL LINE ) :-
महाराष्ट्रामध्ये पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस पश्चिम घाट यांच्या मधल्या चिंचोळ्या भागाला ‛ कोकण किनारपट्टी ’ असे म्हणतात. या भागाची सरासरी रुंदी 50-60 किमी आहे . हीच रुंदी उत्तर भागात 90-95 किमी आहे व दक्षिण भागात 40-50 किमी आहे. कोकण किनारपट्टीचा दक्षिणोत्तर विस्तार हा 720 किमी पर्यंत आहे . दक्षिणेस तेरेखोलची खाडी ते उत्तरेस दमानगंगा नदीच्या खाडी पर्यंत कोकण किनारपट्टीची लांबी आहे . कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा ‛ रिया ’ प्रकारचा आहे .
या क्षेत्राचे संपूर्ण क्षेत्रफळ 30,394 किमी आहे . जे महाराष्ट्र पठार क्षेत्रापेक्षा खूप कमी आहे परंतु या भागातील लोकसंख्या प्रचंड प्रमाणात मोठी आहे . याचे मुख्य कारण मुंबई आहे असे म्हणता येईल .
पश्चिम घाट ( WESTERN GHATS):-
पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखले जाते . या भागाचा दक्षिणोत्तर विस्तार कोकण किनारपट्टी सोबतच तिच्या पूर्वेस झाला आहे . हा भाग जगातील सर्वात महत्वाच्या जैवविविधता हॉटस्पॉट ( BIODIVERSITY HOTSPOT ) म्हणून जाहीर झाले आहे . या भागाला दक्खच्या पठाराचा न खचलेला भाग म्हणून सुद्धा ओळखले जाते . सह्याद्री पर्वतरांग अत्त्यांत उंच व सरळ उभा दिसतो . काही ठिकाणी या भागाची झीज झाली आहे .
सह्याद्री पर्वत हा लोकांच्या राहण्यासाठी अवघड जागा आहे . या कारणामुळे येथे लोकवस्तीचे प्रमान तुरळक आहे . प्राकृतिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतारांगेवर शिखरे , घाट , डोंगर , प्राकृतिक उंचावट्याचे सपाट प्रदेश निर्माण झाले आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सह्याद्री पर्वत हा नैसर्गिक जलविभाजक म्हणून काम करतो . या कारणामुळेच दक्षिण भारतातील मुख्यतः सर्व नद्या पूर्ववाहू आहेत . सह्याद्री पर्वताची खरी ओळख निर्माण करण्याचे काम केले ते शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी . त्यांनी या भागात केलेल्या स्वराज्याची निर्मितीची गंध आजही या मातीत आहे .
महाराष्ट्र पठार ( MAHARASTRA PLATEAU):-
महाराष्ट्र राज्यातील मुख्यतः भाग हा या पठाराने व्यापला आहे . महाराष्ट्राचा 90% भाग हा पठाराचा आहे . महाराष्ट्राच्या पठाराला दख्खनचे पठार म्हणून ओळखले जाते . हा भाग लांबी व रुंदीला जवळपास सारखाच आहे . या भागाची पूर्व – पश्चिम लांबी 750 किमी आहे . तर दक्षिण – उत्तर लांबी 700 किमी आहे. हा भाग भारताच्या मुख्य पठारी भागांपैकी एक आहे .
महराष्ट्र पठाराचा उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे . पश्चिमेस उंची 650 मी. आहे तर पूर्वेस उंची 300 मी. पर्यंत आहे . महाराष्ट्राचे मुख्यतः सर्व जिल्हे याच भागात आहेत . हा भाग डोंगर रांगा व नद्यांच्या खोऱ्यानी व्यापले आहे. या भागातील काळी मृदा कापूस या पिकासाठी अत्त्यांत उपयुक्त ठरते.
महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे :-
- कळसुबाई (1646 मी)
- साल्हेर ( 1567 मी )
- महाबळेश्वर ( 1438 मी )
- हरिश्चंद्रगड ( 1428 मी )
- सप्तश्रृंगी ( 1416 मी )
- तोरणा ( 1404 मी )
महाराष्ट्रातील महत्वाचे घाट :-
- माळशेज घाट
- बोर घाट
- दिवा घाट
- आंबा घाट
- आंबोली घाट
- कुंभार्ली घाट
- फोंडा घाट
या लेखात आपण थोडक्यात महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल जाणून घेतला . पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा राजनैतिक भूगोल . तरी अधिक माहितीसाठी वाचत राहा STAY UPDATED …