महाराष्ट्राचा राजकीय भूगोल ( POLITICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA)

मागील लेखात आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पहिला . या लेखात आपण जाणून घेणार आहेत महाराष्ट्राचा राजनैतिक / राजकीय भूगोल .

महाराष्ट्र हे भारताच्या 28 राज्यांपैकी एक आहे . महाराष्ट्राचा विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त अक्षांश तर 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त रेखांश असा आहे . महाराष्ट्राचा भाग हा भारताच्या मध्यभागात आहे जो उत्तर भारत व दक्षिण भारताला एकत्र करण्याचे काम करतो . महाराष्ट्राच्या राजकीय सीमा विविध राज्यांना लागतात .

वायव्य दिशेला गुजरात राज्य आहे . गुजरातला पालघर , नाशिक , धुळे नंदुरबार या जिल्ह्यांची सीमा लागते .उत्तरेकडे महाराष्ट्राला मध्यप्रदेशची सीमा लागते . मध्य प्रदेश राज्याला आठ जिल्ह्यांची सीमा लागते . या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार , धुळे , जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपूर , भंडारा गोंदिया या जिल्ह्यांची सीमा लागते . तसेच पूर्वेस छत्तीसगढ राज्यासोबत गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमा लागते.आग्नेय दिशेला तेलंगणा राज्यासोबत गडचिरोली , चंद्रपूर , यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत . तसेच दक्षिणेस कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सोलापूर , उस्मानाबाद , लातूर नांदेड या सात जिल्ह्यांची सीमा लागते आणि शेवटी दक्षिणेकडे गोवा राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा आहे .

महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली . त्या वेळेस महाराष्ट्रात 4 प्रशासकीय भाग , 26 जिल्हे 235 तालुके होते . पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात 6 प्रशासकीय भाग , 36 जिल्हे 355 तालुके आहेत . महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग खाली दिली आहे .

महाराष्ट्र राज्य व जिल्हे

महाराष्ट्राचे प्रशासकीय भाग (ADMINISTRATIVE DIVISION OF MAHARASTRA ):-

 • कोकण विभाग ( KONKAN DIVISION)
 • पुणे विभाग ( PUNE DIVISION )
 • नाशिक विभाग ( NASIK DIVISION )
 • औरंगाबाद विभाग ( AURANGABAD DIVISION )
 • अमरावती विभाग ( AMRAVTI DIVISION )
 • नागपूर विभाग ( NAGPUR DIVISION )

कोकण विभाग( KONKAN DIVISION) :-

कोकण विभागात महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्हे व 47 तालुके येतात . या भागाचा संपूर्ण आकारमान 30746 चौ.किमी आहे .महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा ठाणे याच विभागात येतो सोबतच महाराष्ट्राची राजधानी मुंबई या विभागात येत . या विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .

 • मुंबई शहर – 0
 • मुंबई उपनगर – 3
 • ठाणे – 7
 • पालघर – 8
 • रत्नागिरी – 9
 • रायगड – 15
 • सिंधुदुर्ग – 8

पुणे विभाग ( PUNE DIVISION) :-

पुणे विभागात महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्हे व 58 तालुके आहेत . या भागाचा संपूर्ण आकारमान 57275 चौ.किमी आहे . महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणारे पुणे याच विभागात येते. या विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .

 • पुणे – 14
 • सातारा – 11
 • सांगली – 10
 • कोल्हापूर – 12
 • सोलापूर – 11

नाशिक विभाग ( NASIK DIVISION):-

नाशिक विभागात महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्हे व 54 तालुके येतात. या भागाचा संपूर्ण आकारमान 57493 चौ.किमी आहे. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर याच विभागात येतो. या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .

 • नाशिक – 15
 • अहमदनगर – 14
 • धुळे – 4
 • नंदुरबार – 6
 • जळगाव – 15

औरंगाबाद विभाग ( AURANGABAD DIVISION ):-

औरंगाबाद विभागात महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्हे व 76 तालुके आहेत . या भागाचा आकारमान 64813 चौ.किमी आहे . हा प्रशासकीय विभाग सर्व विभागांपेक्षा आकारमानाने सर्वात मोठा आहे .या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .

 • औरंगाबाद – 9
 • जालना – 8
 • बीड – 11
 • परभणी – 9
 • हिंगोली – 5
 • उस्मानाबाद – 8
 • लातूर – 10
 • नांदेड – 16

अमरावती विभाग ( AMRAVTI DIVISION ):-

अमरावती विभागात 5 जिल्हे व 56 तालुके येतात. या भागाचा आकारमान 46027 चौ.किमी आहे.या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

 • अमरावती – 14
 • बुलढाणा – 13
 • अकोला – 7
 • वाशीम – 6
 • यवतमाळ – 16

नागपूर विभाग ( NAGPUR DIVISION ):-

नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे व 64 तालुके येतात . या भागाचा आकारमान 51377 चौ. किमी आहे . महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर याच विभागात येत . या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

 • नागपूर – 14
 • वर्धा – 8
 • भंडारा – 7
 • गोंदिया – 8
 • चंद्रपुर – 15
 • गडचिरोली – 12

जिल्हे निर्मिती :-

महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर त्यात अनेक जिल्ह्यांची नवीन निर्मिती करण्यात आली . तरी 1980 नंतर महराष्ट्रामध्ये झालेल्या जिल्ह्यांची पुनर्रचना खालील यादीत दिली आहे .

 • सिंधुदुर्ग – 1 मे 1981
 • जालना – 1 मे 1981
 • लातूर – 16 ऑगस्ट 1982
 • गडचिरोली – 26 ऑगस्ट 1982
 • मुंबई उपनगर – 1990
 • नंदुरबार – 1 जुलै 1998
 • वाशीम – 1 जुलै 1998
 • गोंदिया – 1 मे 1999
 • हिंगोली – 1 मे 1999
 • पालघर – 1 ऑगस्ट 2014

महाराष्ट्रातील विविध भागात लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे :-

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही वैशिष्ट्यपुर्ण भागांना विविध नावे पडली आहेत . ही नावे सरकारमान्य नसून प्रादेशिक आहेत परंतु अत्यंत लोकप्रिय आहेत . या भागांची यादी खालील प्रमाणे आहे .

कोकण – सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्यामधील अरुंद किनारपट्टीला कोकण असे म्हणतात . कोकण भागात एकुण 7 जिल्हे आहेत .

घाटमाथा – सह्याद्री पर्वताच्या उंचावट्या वरच्या प्रदेशाला घाटमाथा म्हणून ओळखले जाते.

मावळ – सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागाला मावळ प्रांत असे म्हणले जाते .शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली याच प्रांतात स्वराज्य स्थापनेच्या पायभारणीला सुरवात झाली होती .

खानदेश – हा प्रदेश कापूस व केळी साठी महाराष्ट्र भरात प्रसिद्ध आहे . या भागात उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात धुळे , नंदुरबार व जळगाव हे प्रदेश येतात .

मराठवाडा – मराठवाड्यात औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश होतो . मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत . मध्य महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्यास मराठवाडा हे नाव आहे .

विदर्भ – थोडक्यात नागपूर विभागाला विदर्भ म्हणून संबोधले जाते . परंतु या भागात अमरावती विभागाचे 5 तर नागपूर विभागाचे 6 जिल्हे आहेत . संत्र्यासाठी प्रसिद्ध भाग आहे .

या लेखात आपण जाणून घेतले महाराष्ट्राचा राजकीय भूगोल व महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग . तरी पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याची नदीप्रणाली . तरी वाचत राहा STAY UPDATED …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *