नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण अफजलखानाचा वध पाहिला . तरी या लेखात आपण शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतला पराक्रम पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .
अफजलखानच्या वधामुळे आदिलशाही दरबारात आधिच हाहाकार माजला होता त्यात शिवरायांने लगेच पन्हाळा किल्ला जिंकून घेतला . आदिलशहा आता खूप जास्तच चिडला होता सोबतच आपले राज्य संपण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती . त्याने शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जोहर या आपल्या मात्तबर सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले .
सिद्धी जोहर व पन्हाळा :-
सिद्धी जोहर शूर सरदार होता परंतु क्रूर व शिस्तप्रिय सरदार म्हणून त्याची ओळख होती . स्वराज्यावर चाल करून आला तेंव्हा राजे पन्हाळ्यावर होते . सिद्दीने पन्हाळ्याला वेढा चढवला . खूप काळ हा वेढा घालून ठेवला . आता पावसाळा जवळ आला राजांनी विचार केला आता सिद्धी वेढा ढिला करेल परंतु जसा पावसाळा सुरू झाला त्याने वेढा आणखी कडक केला . गडाची शिदोरी संपत आली होते . बाहेरून लढूनही वेढा काही हटत नव्हता . आता राजांनी सिद्दीला पत्र लिहून किल्ला स्वाधीन करण्याचे बोलले . आता सिद्धी खुश झाला . सैनिक थकून गेले होते त्यांनी आता थोडी ढील दिली . राजांनी आता निसटून जाण्यासाठी योजना आखली .
बलिदान स्वराज्यसाठी :-
राजांनी योजना केली की दोन पालख्या तयार केल्या गेल्या . एक पालखी मोकळ्या वाटेने बाहेर पडेल जेणेकरुन ती शत्रूला सहज दिसेल व दुसरी आडबाजुने बाहेर जाईल . दुसऱ्या पालखीत राजे असतील . शिवरायांच्या सेवेत एक तरुण होता तो जवळपास शिवाऱ्यांसारखाच दिसत असे त्याचे नाव शिवा काशीद होते . हा या योजनेसाठी तयार झाला . त्याला माहित होते की सिद्दीच्या हाती लागलो व त्याला समजले की आपण शिवाजी नाही तेंव्हा आपला मृत्यू पक्का होईल . परंतु उंदरसारखे जीवन जगण्यापेक्षा एक दिवस शिवाजी म्हणून जगून मृत्यू पत्कारलेला कधीही चांगलेच .
ठरलेल्या योजनेप्रमाणे दोन्ही पालख्या निघाल्या . पहिली पालखी सहज शत्रूच्या नजरेत आली . त्यांनी तिला पकडल्यावर सिद्दीच्या तंबू जवळ नेण्यात आले . आता सैनिकांमध्ये आनंद पसरला शिवाजी पकडला म्हणून सर्व जण खुश झाले . दरम्यान राजे दुसऱ्या रस्त्याने निघाले सोबत बाजीप्रभू देशपांडे , बांदल बंधू व त्यांनी फौज असे निवडक साथी घेतले व विशाळगडाकडे कूच केली .
थोड्या वेळात शिवाजी राजांची ओळख पटवून घेण्यासाठी फाजलखान( अफजल खानचा मुलगा ) ला बोलवले . त्याने शिवा काशीद ला बघताच हा शिवाजी नाही हे ओळखले . शिवरायांचा व त्यांच्या साथीदारांचा हा कट उघड झाला . आता मात्र सिद्दीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . त्याने लगेच आदेश देऊन शिवा काशीद व त्यांच्या सहकाऱ्यांचे कत्तल केले . स्वराज्याच्या सेवेत स्वतःला कुर्बान करून घेणाऱ्या सुरवातीच्या मावळ्यांमध्ये शिवा काशीद अजरामर झाला .
राजे घोडखिंडीत :-
चवताळून उठलेले सिद्धीचे सैनिक जोरात शिवरायांचा पाठलाग करू लागले . घोडखिंडीपर्यंत येऊ पर्यंत राजांच्या लक्षात आले होते की आता विशाळगड गाठणे कठीण आहे . तेंव्हा त्यांनी घोडखिंडीत लढणे ठरवले . बाजीप्रभू देशपांडे यांना बोलवून राजे म्हणाले ‛आता विशाळगड गाठणे कठीण आहे . तरी आपण येथूनच शत्रूला लढा देऊ ’ बाजीप्रभूला लक्षात आले की आता या ठिकाणी सर्वांचे जीवन धोक्यात आहे .
बाजीप्रभू राजांना म्हणाले ‛राजे तुम्ही पुढे व्हा ! आम्ही व बांदल बधुंची सेना माघे राहून खिंडीत गनीमांना अडवून ठेवतो .’ राजे या गोष्टीला तयार होत नव्हते . पण बाजींनी काही राजांचे ऐकले नाही व काही निवडक सैन्यासह राजांना विशाळगड चढून जाण्यास सांगितले . राजे जाण्याआधी बाजींना म्हणाले ‛ आम्ही विशाळगडावर पोहचल्यावर तोफेचे 5 बार देतो तुम्ही आवाज येताच येथून निसटा .’ परंतु बाजीला ठाऊक होते की गणिमांची संख्या अफाट आहे . आपला यांच्या पुढे काही निभाव लागणार नाही .परंतु स्वराज्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन बाजी घोडखिंडीत उभे राहिले .
झुंज खिंडीतील :-
शिवराय वाऱ्यासारखे गडाकडे निघाले . विशाळगडाचा पायथा अजून काही अंतर होता . इकडे खिंडीत झुंज सुरू होणारच होती . बाजीप्रभुनी आदेश दिल्या प्रमाणे सर्व मावळयांनी खूप मोठ्या प्रमाणावर दगड गोटे गोळा करून ठेवले . मावळ्यांच्या फळ्या लावल्या व योग्य पद्धतीने नियोजन केले .
आता शत्रू खिंड चढू लागला . शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली . मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला . दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत होते . त्यांनी मारहानी सुरू केली . कित्येक गनिमाचे डोके फुटले . काही तर जिवेच ठार झाले . पहिली तुकडी नामोहरम झाली . आता दुसरी तुकडी चालून येऊ लागली . आता मावळे शत्रूवर तुटून पडले . काहींनी दगडांचा मारा चालूच ठेवला . ‛ हर हर महादेवाची’ गर्जना सुरू झाल्या . मावळ्यांच्या मध्ये स्फुरण निर्माण झाले . आता दुसऱ्या तुकडीलाही मावळ्यांनी नामोहरम केले . आता तिसरी तुकडी पुढे सरकू लागली .आता अनेक मावळे पडू लागले . शत्रूने बाजीवर हल्ला चढवला . अंगावर अनेक वार झाले तरी बाजी त्वेषाने लढत होता . हर हर महादेव च्या घोषणा देत होता . मावळ्यांना सूचना देत होता . शत्रूच्या तुकड्या हटत होत्या माघून नवीन तुकड्या येत होत्या पण मावळे त्वेषाने लढत होते . बाजी आता पूर्णपणे घायाळ झाला होता . परंतु त्यांचे पूर्ण लक्ष तोफांकडे होते .
इकडे शिवराय गडाच्या पायथ्याशी पोहचले . गडाला आधीच शत्रूचा वेढा होता . त्यांनी आपल्या त्याच निवडक साथीदारनसह वेढ्यावर हल्ला चढवला आणि वेढ्याचा भेद घेत सरळ गडाच्या माथ्याकडे धाव घेतली . तोफांचे बार केले .
अखेर खिंड पावन झाली :-
बाजीप्रभूच्या कानावर तोफांचे बार आले . आवाज कानी पडताच घायाळ झालेल्या बाजी शांत पडला . आपण आपली चाकरी बजवली या समाधानात बाजीने आपले प्राण सोडले . बाजीप्रभू आणि बांदल लोकांनी युद्धामध्ये शर्थ केली . स्वराज्यासाठी आपले रक्त सांडवले . या सुचनेने शिवराय अत्त्यांत दुःखी झाले . ज्या घोडखिंडीत बाजीने आपल्या स्वामिनिष्ठ स्वभावाचा परिचय दिला व आपल्या प्राणांचे बलिदान दिले . त्या खिंडीचे नाव आजही इतिहासात ‛ पावनखिंड ’ म्हणून प्रसिद्ध आहे . धन्य ते वीर मावळे व धन्य ते बाजीप्रभू देशपांडे !!…
पुढील लेखात आपण शाहिस्तेखानाची फजिती पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …
[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]