या धर्मात अंत्यविधीनंतर गिधाडांना खायला ठेवला जायचा मृतदेह; पाहा वेगवेगळ्या पंथांच्या थरारक प्रथा

जगात वेगवेगळ्या धर्मांत पंथांत अंत्यविधीचे अनेक प्रकार अवलंबले जातात. काही प्रथांबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरातही आहेत अशा स्मशानभूमीच्या जागा.

मानवाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंतचं त्यांचं अस्तिव आहे. प्राण निघून गेल्यानंतर मृत शरीरासोबत अनेक धार्मिकविधी केल्या जातात. आणि शेवटी आपआपल्या धर्मानुसार त्या ममृतं शरीराचा अंत्यविधी करण्यात येतो. जगात अनेक प्रकारच्या अंत्यविधी केल्या जातात. ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत-जास्त अंत्यविधी ह्या अतिशय शास्त्रीय पद्धतीने तसेच भौतिक वातावरण यानुसार केल्या जातात.

हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात मृतदेह लाकडांच्या खाली ठेऊन अग्नी देऊन जाळला जातो. मात्र या तिन्ही धर्मांत मृतदेह पुरला सुद्धा जातो. लहान मुलांच्या मृतदेहाला पुरण्यात येतं. काही ठिकाणी मृतदेहाचं पाण्यात सुद्धा विसर्जन केलं जातं होतं. सध्या या मृतदेहांना इलेक्ट्रोनिक प्रक्रीयेद्वारे अग्नी दिला जातो. या सर्वांच्या पाठीमागे एक कारण स्पष्ट आहे.आणि ते म्हणजे ज्या वेळी जी सुविधा उपलब्ध असते त्याचा त्या धर्मात समावेश केला जातो.

हा काशी मधील ‘मणिकर्णिका’ घाट आहे. याठिकाणी मृतदेहांना जाळून, त्यांची राख घेऊन गंगा नदीत विसर्जित करण्यात येते. या क्रियेला हिंदू धर्मात खूपचं पवित्र मानलं जातं. असं केल्यानं मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे.

मृतदेहांना पुरण्याची प्रथा इस्राईल मधील ‘ज्यू’ लोकांनी सुरु केली होती. कारण इस्राईल सारख्या पश्चिम देशांमध्ये थंड वातावरणामुळे आग लावणं खूप कठीण आहे. त्यामुळे धर्माने लोकांना पुरण्याची परवानगी दिली. तसेच वैदिक काळात भारतात काही संतानी समाधी घेतल्याचे पुरावे सुद्धा सापडतात.

ज्यू’ लोकांनी सुरु केलेली परंपरा जास्तीत जास्त ‘मुस्लीम’ लोकांनी आत्मसात केली आहे.

पारसी धर्मामध्ये मृतदेहांना ना जाळलं जातं ना पुरलं जातं. याठिकाणी मृतदेहांना उघड्यावर टाकलं जात होतं. त्यांना गिधड येऊन खाऊन जातात. मात्र काही वर्षांपासून गिधाडंची संख्या कमी झाल्यामुळे याठिकाणी सुद्धा मृतदेहांना पुरलं जातं, तसेच या ठिकाणी सौरउर्जेच्या तबकडी बसविल्या आहेत त्या मृतदेहांना जाळून राख करतात.

पारशी (झोरास्ट्रियन) धर्मामध्ये मृतदेहाला एका उंच मनोऱ्या सारख्या ठिकाणी ठेऊन दिलं जातं. आणि त्याला खाण्यासाठी गिधाडांना आमंत्रित केलं जातं. ही मुंबई मधील पारशी स्मशानभूमी आहे . त्यालाच ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ असं म्हटलं जातं.

मुंबईमध्ये मलबार हिल या उच्चभ्रू आवारात हे टॉवर ऑफ सायलेन्स आहे. याठिकाणी चोहोबाजूंनी घनदाट जंगल आहे. आणि मध्यभागी ही स्मशानभूमी आहे. 19 व्या शतकात याची निर्मिती करण्यात आली होती. याठिकाणी केवळ एकच लोखंडी दार आहे. आणि याचं छतदेखील मोकळं आहे.

पारसी धर्मालाच भारताबाहेर जोरास्ट्रीयन्स धर्म म्हटलं जातं. तब्बल 3 हजार वर्षांपासून हे लोक ‘दोखमेनाशिनी’ हा अंत्यविधीचा प्रकार चालवत आहेत.

मेक्सिको, श्रीलंका, चीन, तीब्बत, थायलंड याठिकाणी सुरुवातीला मृतदेहांना मसाला लावून, घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवण्यात येतं होतं. हे मृतदेह कधी ना कधी परत जिवंत होईल असं यापाठीमागे कारण होतं. खोदकामात सापडलेली असे काही मृतदेह अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत. ते 3500 वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येतं.

सुरुवातीच्या काळात ज्यू लोकांचे वंशज हे मृतदेह एखाद्या गुहेत नेऊन ठेवत असत. जेव्हा येशूला फासावरून उतरविलं गेलं होतं. तेव्हा त्यांना सुद्धा गुहेत नेवून ठेवल्याचं सांगितलं जातं.

टीप : वरील माहिती हि पूर्णपणे वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली असून यात काही त्रुटी किंवा चुका असण्याची शक्यता आहे. हि माहिती केवळ शैक्षणिक कारणासाठी पोस्ट करण्यात आली आहे. जर यातून कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पोस्ट वेबसाइटवरून हटविण्यात येईल.

in-this-religion-vultures-carcasses-are-eaten-after-funerals

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *