जाणून घ्या ! संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) रचना , सदस्य , अध्यक्ष , कार्यकाल…

मित्रांनो आपण बरेच जण संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (UPSC – UNION PUBLIC SERVICE COMMISSION ) तयारी करत असाल. परंतु तुम्हाला संघ लोकसेवा आयोगाची रचना , सदस्य , अध्यक्ष , कार्यकाल या बद्दल माहिती आहे का ?

भारतीय संघ राज्याचे मुख्य अधिकारी घडविण्याचे कार्य व देशाला योग्य प्रशासकीय अधिकारी देण्याचे कार्य ही संघटना करते .सोबतच या विषयावर स्पर्धा परीक्षामध्ये अनेक वेळेस प्रश्न विचारले जातात. तरी आज या लेखात आपण STAY UPDATED परिवारासोबत जाणून घेणार आहेत संघ लोकसेवा आयोगाबद्दल.

रचना

संघ लोकसेवा आयोगाची रचना कलम 316 अंतर्गत होते. आयोगास एक अध्यक्ष व इतर 9-10 सदस्य असतात. या सदस्यांपैकी किमान 50% सदस्यांना नियुक्तिपूर्वी किमान 10 वर्ष केंद्र व राज्यांच्या नियंत्रणाखालील अधिकार पदावर काम केलेले असणे आवश्यक आहे .
नियुक्ती व कार्यकाल
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती स्वतः राष्ट्रपती करतात. अध्यक्ष अनुपस्थित असल्यास राष्ट्रपती एखाद्या सदस्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करू शकतात. पद ग्रहण केल्या नंतर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष या पैकी जे अगोदर पूर्ण होईल ते ग्राह्य धरले जाते.

बढती

बढती बाबत कलम 317 मध्ये दिले आहे . या अनुसार

1) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांनी पदावर असताना गैरवर्तन केल्यास राष्ट्रपती हा मुद्दा सर्वोच्च न्यालायकडे सोपवतात. कलम 145 मधील तरतुदीनुसार चौकशी करून सर्वोच्य न्यायालयाने राष्ट्रपतींना कळविल्या नंतर राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार अध्यक्ष व सदस्य यांना पदावरून दूर करता येते.
2) खालील पैकी कोणत्याही मुद्यावर राष्ट्रपती आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरून हटविण्याचे आदेश देऊ शकतात.
अ) ते भ्रष्टाचारी/ दिवाळखोर असतील तर
ब) आयोगावर कार्यरत असताना अन्य सेवेत काम करत असतील तर
क) मानसिक अथवा शारीरिक दुर्बल असतील तर

संघ लोकसेवा आयोगाची कार्य

संघ लोकसेवा आयोगाची कार्य हे कलम 320 अनुसार निर्धारित केले आहेत. संघ राज्याच्या सेवांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी परीक्षा घेणे गरजेचे असते. दोन किंवा अधिक राज्यांच्या विनंतीवरून संयुक्त भरतीच्या योजना तयार करून त्या अमलात आणण्यासाठी साहाय्य करणे हे मुख्य कार्य आहेत.

संघ लोकसेवा आयोगाचा खर्च व अहवाल

कलम 322 अनुसार संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष , सदस्य व कर्मचारी यांचे वेतन , भत्ते व पेंशन तसेच आयोगाचा अन्य खर्च भारताच्या एकत्रित निधीतून दिला जातो . कलम 323 अनुसार संघ लोकसेवा आयोग आपल्या कामाचा अहवाल दार वर्षी राष्ट्रपतींना सादर करतात. राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे त्यांच्या स्पष्टीकरणासह सादर करतात.
कलम 318 अंतर्गत संघ लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या व त्यांच्या सेवा शर्ती निर्धारित करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत .

संघ लोकसेवा आयोगाचे सदस्यत्व समाप्त झाल्या नंतर अन्यत्र पदे धारण करण्याबाबत निर्बंध हे कलम 319 अनुसार लावण्यात आले आहेत. या अंतर्गत पुढील प्रमाणे निर्बंध आहेत-

1) आयोगाचे अध्यक्ष त्याच्या पद कालावधी संपल्यानंतर भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली नोकरी करू शकत नाह
2) संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्य त्यांचा पदावधी संपल्या नंतर –
अ) संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष बनू शकतात .
ब) देशातील कोणत्या राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनू शकतात मात्र केंद्र अथवा राज्य सरकारच्या खाली अन्य कोणतीही नोकरी करू शकत नाहीत.

संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्य राजीनामा

संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना मुदतपूर्व राजीनामा द्यायचा असल्यास आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात.

या पद्धतीने संघ लोकसेवा आयोगाचे कार्य चालते . तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा व अधिक माहितीसाठी वाचत रहा STAY UPDATED……

[ नक्की वाचा : यूपीएससी परीक्षा | पात्रता, आयोजित परीक्षा, पदांची नावे, परीक्षा स्वरूप, इतिहास | संपूर्ण माहिती ]

what is upsc in marathi | what is upsc all about in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *