Advantage of Anjeer: जाणून घ्या, अंजीर चे हे ’10’ महत्वाचे उपयोग

Advantage of Anjeer: वेगळी चव असण्याबरोबरच जाणून घ्या अंजीर चे हे '10' महत्वाचे उपयोग
[ad_1]
अंजीर ची चव जितकी वेगळी असते आरोग्याच्या दृष्टीनेही ते तेवढेच फायदेशीर आहे. हे एक गोड फळ आहे जे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांनाच आवडते. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. आज जाणून घेऊयात अंजीर चे फायदे.
    • वाळलेल्या अंजिराला उकळवून व्यवस्थित पीसून घश्याच्या सूज किंवा गांठ्यावर बांधा, यामुळे लवकरच आराम मिळतो.
    • सामान्य बद्धकोष्ठतेच्या स्थितीत, गरम दुधात वाळलेल्या अंजीर उकळवून त्याचे सेवन केल्यास सकाळचे पोट साफ होते.
    • ताजे अंजीर खाणे व वरून दूध पिणे हे खूप शक्तिशाली आणि वीर्य वर्धक आहे.
    • वाळलेल्या अंजिराचे सेवन दूध व साखर कँडीबरोबर सतत एका आठवड्यापर्यंत केल्यास रक्त विकार दूर होतो.
    • अंजीरचे सेवन विशेषत: मधुमेहात फायदेशीर ठरते
    • कोणत्याही प्रकारचा बाहेरचा पदार्थ पोटात गेला तर अंजीर तो काढून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात ते खाणे उपयुक्त ठरते.
    • दमा (अस्थमा ) असल्यास वाळलेल्या अंजीरचे सेवन आहारात केल्याने फायदा होतो.
    • क्षयरोगात (TB ) कफची निर्मिती थांबवण्यासाठी ताजे अंजीर खाणे फायदेशीर ठरते.
    • ल्युकोरियामध्येही अंजीर खाणे  फायदेशीर ठरते.
    • कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीरचा उपयोग फायद्याचा आहे, विशेषत: पोट खराब झाल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी अंजीर खावे.

[ad_2]

(टीप– या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)

Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *