Education Loanसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्र महत्वाची, जाणून घ्या!

[ad_1]

Education Loan

विदेशात जाऊन उत्तम करिअर करण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. पण विदेशात शिक्षणासाठी खर्च देखील तितकाच असतो. दरवर्षी ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी विदेशातील विद्यापीठ, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतात. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त असून देखील प्रत्येकालाच स्कॉलरशिप मिळत नाही. ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही ते लोन घेऊन शिक्षण पूर्ण करतात.


डिजीटल एज्युकेशन लोनसाठी कागदपत्र
एकदा तुम्ही कॉलेजची अर्ज प्रक्रिया पूर्ण केली की तुम्हाला ऑफर लेटर मिळते. तेव्हा कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र आहेत का? याची खात्री करुन घ्या. मग तुम्हाला बॅंकेतून ठरवल्या गेलेल्या निर्देशांची काळजी करण्याची गरज नाही. डिजिटल एज्युकेशन लोनमध्ये यामार्फत लोन मिळू शकते.

एज्युकेशन लोन घेण्यासाठी अर्ज करताना तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणे गरजेचे आहे ? याची माहिती घेऊया.

केवायसी: पॅन कार्ड, आधार आणि पासपोर्ट


शैक्षणिक: दहावी आणि बारावीची मार्कशीट, पोस्ट ग्रेज्युएशन असेल तर त्याचे प्रमाणपत्र


आर्थिक: तीन महिन्यांचे पेमेंट स्लिप, सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, फॉर्म १६ (उमेदवार नोकरीस असेल तर)

को-अॅप्लिकंटसाठी


केवायसी: पॅन, आधार


आर्थिक: पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तीन महिन्यांची पेमेंट स्लिप, बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न स्लिप किंवा फॉर्म १६ व्यवसाय असल्यास व्यवसायाचा पुरावा, बॅंक स्टेटमेट आणि दोन वर्षांसाठी आयटीआरचा पुरावा

डिजीटल एज्युकेशन लोन घेण्याचे फायदे


डिजीटल कर्जदात्यांकडून लोन घेण्याची प्रक्रिया खूप सरळ असते. यामध्ये कागदपत्राचे व्यवहार करावे लागत नाहीत. याचा हा एक फायदा असतो. डिजीटल कर्जदारांना देखील अनेक फायदे मिळतात. कर्ज देताना वेळेसाठी नवे मूल्यांकन पॅरामीटर्स लावले जातात. याशिवाय ऑनलाइन कर्ज हे तुम्हाला पैसे वाचवण्यास देखील मदत करतात. तुम्हाला कॅश किंवा परदेशी चलन घेऊन जाण्याची काळजी करण्याची गरज नाही. ते तुम्हाला बेस्ट एक्सचेंज ऑफर देऊन डॉलर वाचवण्यास मदत करतात.

[ad_2]

Firstly Uploaded On : Source link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *