भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग – 1
मानवाच्या निसर्गावर चाललेल्या संघर्षातून अनेक घटना उदयाला आल्या. लोकांना उदरनिर्वाहासाठी जंगले, पर्वतमय प्रदेश, टणक जमीन, दुष्काळ, पूर, हिंस्र व अन्य श्वापदे यांच्याशी सामना करून त्यावर मात करावी लागली. याच प्रक्रियेतून त्यांनी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला;